PSI विरोधातील लैंगिक छळ आणि 80 लाख रुपये फसवणुकीची दखल घेतली नाही, युवतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष - कुतिन्हो

Adv Pratima Coutinho: महिलांनी न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल प्रतिमा कुतिन्हो यांनी केला
Adv Pratima Coutinho
Adv Pratima CoutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे याच्याविरोधात लैंगिक छळ आणि 80 लाख रुपयांना फसविल्याबद्दल सत्तावीस वर्षीय युवतीने तक्रार देऊनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊनही दहा दिवसांत त्याचे निलंबन मागे घेतले जाते आणि आपल्या तक्रारीवर तपास सुरू असल्याचे उत्तर त्या युवतीस मिळते.

यावरून महिलांनी न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी कुतिन्हो बोलत होत्या. याप्रसंगी ती पिडीत युवतीही उपस्थित होती. त्या पुढे म्हणाल्या, पिडीत युवतीशी पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांच्यात फेसबूकवरून मैत्री केली.

त्या युवतीला पिंगे याची पार्श्‍वभूमी माहीत नव्हती. फोंडा येथे कार्यरत असताना पिंगेने तिच्याशी मैत्री वाढविली. त्यानंतर पिंगे याने त्या युवतीला आपले पहिले लग्न झाले आहे, आपला पहिला विवाह धोक्यात आहे, आपण घटस्फोट घेणार आहोत, असे सांगितले आणि स्वतःबद्दल पिंगेने तिच्यामध्ये विश्‍वास वाढविला.

Adv Pratima Coutinho
Goa And World Bank MoU: 1650 कोटींच्या हवामान निधीसाठी गोव्याचा करार

कुतिन्हो म्हणाल्या, नाशिकला प्रशिक्षणासाठी असताना पिंगे याने त्या युवतीला बोलावले. तिच्याबरोबर त्याने तिथे एका हॉटेलमध्ये शारीरिक संबंधही जोडले. दुसऱ्या रात्री ती युवती गोव्याला परतली आणि तिने आपली वैद्यकीय तपासणी केली आणि तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचे पुरावे ठेवलेले आहेत.

पिंगे याने त्या युवतीशी विवाह केला आणि सांकवाळ येथे ते दोघे राहत होते. परंतु एका मालमत्तेतून त्या युवतीच्या वडिलांना 80 लाख रुपये आले होते, याची चाहूल पिंगे याला लागली.

Adv Pratima Coutinho
Mormugao Municipality: मुरगाव पालिका बैठकीत गाजला ‘कोळसा’

त्या रकमेतील आई व वडिलांच्या नावावर प्रत्येकी 21 लाख रुपये बँक खात्यात आम्ही टाकले. परंतु पिंगे हा सतत तिला त्रास देत राहिला आणि पैशाची विचारणा करीत राहिला. परंतु हळहळू करून त्याने तिच्याकडून पैशाची मागणी करीत 80 लाख रुपयांना गंडा घातला आहे. सध्या हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. अखेर या युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

दहा दिवसांत निलंबन मागे!

तत्कालीन महिला पोलिस अधिकारी सुचिता देसाई यांनी पिंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परंतु दहा दिवसांनी निलंबित मागे घेऊन त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि आता सांगे येथे तो कार्यरत आहे. महिला हक्क आयोगाकडे चार दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Spending
Goa Environmental Movements
Parul Gulati Goa Villa
Goa Excise Department liquor Seizure
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com