प्रतिमा कुतिन्होंच्या अडचणीत वाढ

म्हापसा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
Pratima Coutinho News
Pratima Coutinho NewsDainik Gomantak

पणजी : पर्वरी येथील सचिवालयाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पॅरा शिक्षकांच्या आंदोलन प्रकरणी म्हापसा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावरील सुनावणीवेळी आज उपस्थित न राहिल्याने प्रतिमा कुतिन्हो व ऐश्‍वर्या साळगावकर यांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करुन 4 ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

(Court issues non-bailable warrants against Pratima Coutinho)

Pratima Coutinho News
सुवासिनींच्या उत्साहाला उधाण! राज्यात आज वटपौर्णिमा धार्मिक विधीनुसार साजरी

राज्यातील पॅरा शिक्षकांनी 2017 मध्ये त्यांना सेवेत नियमित करण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला प्रतिमा कुतिन्हो तसेच ऐश्‍वर्या साळगावकर या महिला नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. हे आंदोलन बरेच दिवस पणजीत सुरू होते. सरकारकडून त्यांना ठोस आश्‍वासन मिळत नसल्याने पॅरा शिक्षकांनी विधानसभेवर मोर्चा नेत पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला होता.

हा महामार्ग अडवल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिस बळाचा वापर करून या पॅरा शिक्षकांना तेथून हटवण्यात आले होते. या धक्काबुक्कीवेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या तसेच अनेक पॅरा शिक्षिका जखमी झाल्या होत्या.

Pratima Coutinho News
हणजूणमधील आणखी एका बेकायदा मसाज पार्लरला टाळे

पर्वरी पोलिसांनी काही पॅरा शिक्षकांसह प्रतिमा कुतिन्हो व ऐश्‍वर्या साळगावकर यांना ताब्यात घेतले होते व त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 341, 332, 323 नुसार गुन्हा दाखल केला होता. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते व त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com