म्हापसा: हणजूण परिसरातील आणखी एक बेकायदा मसाज पार्लरला उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. गेल्या आठवड्यात पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी हणजूण पोलिसांसोबत कारवाई करीत ‘अलगा सेंटर फॉर आयुर्वेदिक अॅण्ड हिलिंग’ नामक या बेकायदा मसाज पार्लरवर छापा टाकला होता.
(Action against an illegal massage parlor in goa)
याबाबत हणजूण पोलिसांनी या कथित पार्लर संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यानुसार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आयएएस श्रीमती मामु हागे यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी गुरुदास नाईक यांनी या कथित पार्लरला मंगळवारी टाळे ठोकले. हणजूणमधील हे दुसरे बेकायदा मसाज पार्लर आहे, जे बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, हल्लीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील बेकायदा मसाज पार्लरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उत्तर गोव्यातील किनारी भागांत पोलिसांकडून अशाप्रकारे अनधिकृत मसाज पार्लरवर छापा सत्र सध्या पोलिसांकडून आरंभले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.