Fire in Goa : म्हादई अभयारण्‍य धुमसतेय; यंत्रणा हताश

पाच ठिकाणी लावली आग; नौदलाच्‍या हेलिकॉप्टरची घेणार मदत
Fire At Santrem village
Fire At Santrem village Dainik Gomantak

गोव्याची जीवनदायिनी असलेल्‍या म्हादई नदीच्‍या खोऱ्यात आणि अभयारण्यात पाच ठिकाणी षड्‌यंत्र करून आग लावण्‍यात आलेली आहे. विशेष म्‍हणजे तेथे अग्निशामक दल व आपत्कालीन यंत्रणा पोहोचू शकत नाही. त्यामुळे दल आणि वन खाते हतबल झाले आहे.

आणखी काही दिवस तरी म्‍हादई धुमसतच राहण्‍याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण आणण्‍यासाठी आता नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज सुर्ला भागातील आगीच्या घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार, साहाय्‍यक वनसंरक्षक अमित गेमावत, उत्तर गोवा वनसंरक्षक आनंद जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Fire At Santrem village
Cortalim : वेल्साव, कासावली किनाऱ्यावर वाळू उपसा; आमदार आंतोनीयो वाझ यांनी केली पाहणी

राणे म्हणाले की, या सर्व आगीच्‍या घटना मानवनिर्मित आहेत. त्‍या हेतुपुरस्‍सर लावण्‍यात आलेल्या आहेत. आग कोणी लावली, याचा तपास लावला जाईल. वन विभाग चौकशी करत आहे. पण नागरिकांना विनंती करतो की, अशा आगी लावू नकात. कारण त्या नियंत्रणात येऊ शकत नाहीत. त्‍यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते.

सुर्ला भागातील आग काहीशी आटोक्यात आली असली तरी आज रात्रभर तेथे नजर ठेवण्‍यात येईल. त्यानंतर उद्या सकाळी याबाबत निर्णय घेतला जाईल. नौदलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

दुर्मीळ वनसंपदा, वन्यजीव भक्ष्‍यस्‍थानी?

राखीव जंगल आणि अभयारण्यातील वनसंपदा आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा मुक्तपणे वावर तेथे असतो. शिवाय आधिवासही उघड्यावर असतो.

दुसरी गोष्‍ट म्‍हणजे सध्या पक्ष्‍यांचा अंडी घालण्याचा हंगाम आहे. लार्क, चांडोल, नाईटजार, जंगली कोंबड्या यासारखे पक्षी जमिनीवर अंडी घालतात. साप, पाली, बेडूक आदी सरपटणारे प्राणीही तेथे आहेत. हे प्राणी आतापर्यंत आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले असावेत, अशी भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

Fire At Santrem village
Ranjita Pai : गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै

भाजप सरकार पर्यावरणविरोधी असून, राज्‍यात आगमाफिया सक्रिय झाले आहेत. साट्रे-सत्तरी, नावेली व केपे-कुडचडेचे डोंगर, कोरगाव येथील काजू बागायत, पाडेल-बेतोडा, आग्वाद व इतर ठिकाणी गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्‍यात यावी.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात सुकलेला पाला आणि गवत आहे. त्यामुळे आग नियंत्रणात असली तरी ती पुन्हा भडकू शकते. यासाठी १०० हून अधिक वन कर्मचारी आगीवर लक्ष ठेवून आहेत. आमच्याकडे छोटे टँकर आहेत, त्यांना पंप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला जातोय.

- सौरभ कुमार, मुख्य प्रधान वनसंरक्षक

नौदलाच्‍या हेलिकॉप्‍टरद्वारे एरियल सर्व्हे

म्‍हादईच्‍या खोऱ्यात रविवारी लागलेली आग आज आणखी पसरली. त्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरना पाचारण करण्यात आले. या हेलिकॉप्टरच्या साहाय्‍याने एरियल सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार 8 ते 9 ठिकाणी आग लागली आहे. सध्या आगीवर लक्ष ठेवले जात असून गरज पडल्‍यास पुन्हा नौदलाची मदत घेण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com