वास्को : गेली अनेक वर्षे रखडलेला कुठ्ठाळी कला भवन प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या कुठ्ठाळीच्या उमेदवार एलिना साल्ढाणा यांनी बुधवारी दिली. "कला भवन अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत होते. बांधकाम सुरू करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण त्यात अनेक जाचक नियमांचा समावेश होता. तरीही आम्ही बांधकाम सुरू करू शकलो,असे पत्रकारांशी बोलताना एलिना पुढे म्हणाल्या. (Alina Saldanha News Updates)
आम्ही कला भवन पूर्णत्वाकडे नेत आहोत, ते पूर्ण झाल्यावर ते कला आणि संस्कृती विभागाकडे सोपवले जाईल,असेही एलिना (Alina Saldanha) म्हणाल्या.
नाट्यशास्त्र महाविद्यालयाच्या निवासस्थानाव्यतिरिक्त, कला भवन संगीत आणि चित्रकला वर्ग देईल. ज्याचा लाभ कुठ्ठाळी आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) लोकांना मोठ्या प्रमाणात होईल. आधी हा प्रकल्प अवघड वाटत होता, कारण कला भवन हे पालक विभागाशिवाय सुरू करण्यात आले होते. त्यामुळेच आम्हाला दीड वर्षे लागली. कोणीही जबाबदारी घेऊ इच्छित नव्हते. कला आणि संस्कृती मंत्र्यांनीही नकार दिला,अशी माहिती साल्ढाणा यांनी दिली.
'दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन मी हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनीच जीएसआयडीसीला प्रकल्प ताब्यात घेण्यास सांगितले. आम्ही उर्वरित 80 टक्के काम पूर्ण केले आहे. फ्लोअरिंग, भिंती , रंगकाम, वीज, आणि इतर सर्व आवश्यक कामे पूर्ण करायची होती. आम्ही दर्जेदार कामावर विश्वास ठेवतो आणि लवकरच हा प्रकल्प पूर्ण करु,' असेही साल्ढाणा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.