Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Goa Accident: खोर्ली येथील रेल्वे पुलाजवळ बेफिकीरपणे चालवलेल्या मारुती सुझुकी एस-क्रॉस (Maruti Suzuki S-Cross) गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिली.
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खोर्ली येथील रेल्वे पुलाजवळ बेफिकीरपणे चालवलेल्या मारुती सुझुकी एस-क्रॉस (Maruti Suzuki S-Cross) गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृताचे नाव मनोज काणकोणकर (वय ३९) असे असून तो स्थानिक रहिवासी होता.

ही दुर्घटना रविवारी उशिरा रात्री घडली. मनोज काणकोणकर रेल्वे पुलाजवळून पायी जात असताना वेगाने येणाऱ्या एस-क्रॉस गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाले. तातडीने त्याला जवळच्या इस्पितळात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Goa Accident
Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

या घटनेनंतर जुने गोवा पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) कलम २८१ (बेफिकीर वाहनचालकाने सार्वजनिक रस्त्यावर धोका निर्माण करणे) आणि कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चालकाचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल.

Goa Accident
Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

स्थानिक नागरिकांनी या अपघातानंतर त्या परिसरात वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कोर्लीम रेल्वे पुलाजवळील हा भाग वारंवार अपघातप्रवण ठरत असून वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com