मागील अर्थसंकल्पात केलेल्या 56 टक्के घोषणांच्या पूर्ततेत अपयश: काँग्रेस

252 पैकी 111 कामे: मागील अर्थसंकल्पाचा कृती अहवाल
Failure to comply with 56 per cent of announcements made in previous budget
Failure to comply with 56 per cent of announcements made in previous budget Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप सरकारने 2021 - 22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध विकासकामे व योजनांसंदर्भात 252 घोषणा केल्या होत्या त्यापैकी 111 घोषणांची पूर्तता झाली आहे. या आर्थिक वर्षात भाजप सरकार फक्त 44 टक्के विविध प्रकल्प व योजना लागू करण्यात यशस्वी होऊ शकल्याचे सरकारने सादर केलेल्या कृती अहवालात (ॲक्शन टेकन रिपोर्ट) नमूद केले आहे. यावरून भाजप सरकार अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी 56 टक्के पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात 42 घोषणांचा समावेश करण्यात येणार असून त्यामध्ये गेल्या वर्षातील पूर्ण न केलेल्या प्रकल्पांची कामे जी अंतिम टप्प्यात आहेत, त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्यापैकी सुमारे 98 कामे ही मार्च 2023 नंतर पूर्ण होणार आहेत. काही प्रकल्पांचे काम सध्या सुरू असून काही कामांची पूर्वनिविदा काढण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

Failure to comply with 56 per cent of announcements made in previous budget
सभापती तवडकरः काणकोणचा विकास होणारच

वीज खात्यातर्फे 26 घोषणा करण्यात आल्या होत्या त्यापैकी फक्त 6 पूर्ण करण्यात आल्या आहेत तर 11 या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. 9 घोषणांची पूर्तता मार्च 2023 नंतर होईल.

क्रीडा क्षेत्रासाठी 14 घोषणांचा वर्षाव करण्यात आला होता मात्र त्यातील फक्त ३ मागील वर्षात पूर्ण झाल्या तर 8 यावर्षीच्या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. उर्वरित ३ घोषणा मार्च 2023 नंतर पूर्ण होतील.

Failure to comply with 56 per cent of announcements made in previous budget
गोवा अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्राकडे दुर्लक्ष

या कामांची सुरूवातच नाही !

मजूर, मानसोपचार, गोवा औद्योगिक विकास महामंडळ, कार्मिक, प्रोव्हेदोरिया, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (उत्तर), वन, अग्निशमन दल व कायदा या खात्यांसाठी घोषित केलेल्या कामांची गेल्यावर्षी सुरुवातही झालेली नाही. या घोषणा मार्च 2023 नंतर पूर्णत्वास लागतील असे या कृती अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘बांधकाम’च्या 19 पैकी 7 कामांची पूर्तता

मागील अर्थसंकल्पामध्ये गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे 24 प्रकल्पांच्या कामांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी 8 प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर 6 प्रकल्प आगामी आर्थिक वर्षात पूर्ण होतील व 9 प्रकल्प मार्च 2023 नंतर पूर्ण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 19 कामांपैकी मागील आर्थिक वर्षात 7 कामे पूर्ण झाली तर 5 या वर्षात होतील व उर्वरित 7 मार्च 2023 होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com