केपे: प्रेयसीच्या प्रेमात आंधळा झालेल्या प्रथमेश नाईक या दत्तक मुलाने आपल्या आईचा खून करण्याच्या घटनेमुळे धडे-सावर्डेबरोबरच परिसरातही खळबळ माजली आहे. हे संबंध तोडले नाहीत तुला संपत्तीत वाटा मिळणार नाही, असे त्याला बजावण्यात आले होते. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशा निष्कर्षाप्रत पोलिस पोचले आहेत. दरम्यान, आपल्या प्रेयसीच्या मदतीने आपल्या आईचा खून करणाऱ्या प्रथमेश याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी तर त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला मेरशी येथे बालसुधारगृहात पाठवले आहे.
प्रथमेशच्या प्रेमाला वडील मंगलदास नाईक यांचा विरोध होता. आपल्याला मालमत्ता मिळणार नाही याच रागातून प्रथमेशने आपल्या आई-वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला होता, अशी चर्चा सध्या सावर्डेत सुरू आहे. प्रथमेश हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर मंगलदास नाईक यांनी आपली काही संपत्ती नातलगांच्या नावावर केली होती. याचाही प्रथमेशला राग होता. परवा 28 मार्च रोजी सकाळी मनीषा नाईक ही प्रथमेशची आई घरात एकटीच होती. मंगलदास नाईक हे आपल्या सावर्डे-तिस्क येथील दुकानावर गेले होते. हीच संधी साधून प्रथमेशने आपल्या प्रेयसीच्या मदतीने तिच्या डोक्यावर तसेच पाठीवर लोखंडी सळईने वार करून खून केला होता.
तीन महिन्यांचा असताना दत्तक
मूलबाळ नसल्याने मंगलदास व मनीषा नाईक या दाम्पत्याने प्रथमेश याला तो तीन महिन्यांचा असताना दत्तक घेतले होते. पण हाच मुलगा आपला काळ बनेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता, असे मंगलदास नाईक यांनी सांगितले. पत्नीच्या जाण्याने ते पूर्णपणे खचले आहेत.
असा केला प्लॅन
सकाळी साडेदहाच्या सुमारास आईचा हिचा खून केल्यानंतर प्रथमेश व त्याच्या प्रेयसीने रक्ताने माखलेले कपडे बदलून तसेच खून करण्यासाठी वापरलेली हत्यारे घराशेजारीच आसलेल्या विहिरीत टाकून एका ट्रकाद्वारे कुडचडे गाठले. तेथून मारुतीगडावर जाऊन ही दोघेही निवांत बसली, जणू काही झालेच नाही. खुनाच्या तीन दिवस अगोदर प्रथमेशची प्रेयसी घरातून गायब झाली होती. पण मुलीच्या पालकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. तिच्या वडिलांनी तिला फोन केला असता आपण प्रथमेशबरोबर असल्याचे तिने सांगितले. खून करण्यापूर्वी 26 रोजी दोघांनीही कुडचडे येथील आंबेडकर चौकाजवळ तर 27 रोजी धडे येथील मंगलदास यांच्या घराच्या गच्चीवर रात्र घालवली व 28 रोजी संधी साधली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.