Cooch Behar Trophy: गोव्याला कमजोर फलंदाजी नडली; मुंबईचा डावासह 12 धावांनी दणदणीत विजय

सामना तीन दिवसात जिंकल्याने मुंबईला बोनस गुण
Cooch Behar Trophy 2023
Cooch Behar Trophy 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy 2023: गोव्याचे कमजोर फलंदाजीचे दुखणे कायम राहिल्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच मोठा पराभव पत्करावा लागला. मुंबईने चार दिवसीय सामना रविवारी तिसऱ्याच दिवशी डाव व १२ धावांनी जिंकून बोनस गुणाची कमाई केली.

कांदिवली-मुंबई येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत गोव्याचा दुसरा डाव रविवारी १९० धावांत आटोपला. गोव्याचा पहिला डाव २०१ धावांत आटोपल्यानंतर मुंबईने २०२ धावांच्या आघाडीसह प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादला होता.

शनिवार दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात ४ बाद ११० धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांचा दुसरा डाव १९० धावांत संपुष्टात आला.

Cooch Behar Trophy 2023
World Cup 2023 Final: रोहित-गिल जोडी 'हिट', गांगुली-तेंडुलकर यांच्या खास क्लबमध्ये सामील!

शंतनू नेवगी कालच्याच ४६ धावांवर बाद झाल्यानंतर गोव्याचे फलंदाज नियमित अंतराने बाद होणे कायम राहिले.

अकराव्या क्रमांकावरील स्वप्नील गावकर याने ३९ चेंडूंत ३९ धावा केल्यामुळे गोव्याला डावाचा पराभव टाळण्याची संधी प्राप्त झाली, मात्र रुद्रेश शर्मा बाद झाल्यामुळे शेवटच्या विकेटची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली आणि मुंबईला पुन्हा फलंदाजीस उतरावे लागले नाही.

पुढील सामना घरच्या मैदानावर

गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना घरच्या मैदानावर होईल. २४ नोव्हेंबरपासून सांगे येथील जीसीए मैदानावर त्यांचा सामना चंडीगडविरुद्ध होईल. चंडीगडच्या खाती सात गुण आहेत.

त्यांनी पहिल्या लढतीत त्रिपुरा संघावर डाव व २३६ धावांनी मोठा विजय प्राप्त केला. त्यामुळे गोव्यासमोर खडतर आव्हान असेल.

Cooch Behar Trophy 2023
World Cup 2023: कोहलीचा 'विराट' कारनामा! फायनलमध्ये फिफ्टी ठोकत 'हा' विक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

संक्षिप्त धावफलक

मुंबई, पहिला डाव ः ९ बाद ४०३ घोषित.

गोवा, पहिला डाव ः २०१ व दुसरा डाव (४ बाद ११० वरून) ः ५६.१ षटकांत सर्वबाद १९० (शंतनू नेवगी ४६, जीवन चित्तेम २०, पुंडलिक नाईक ४, कौस्तुभ पिंगुळकर १०, युवराज सिंग ५, रुद्रेश शर्मा ५, स्वप्नील गावकर नाबाद ३९, उमर खान ३०-२, मनन भट ४०-३, अथर्व भगत ४१-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com