Cooch Behar Trophy: गोव्याला मोठी आघाडी घेण्यात अपयश; त्रिपुराचे दुसऱ्या डावात जोरदार प्रत्युत्तर

बिनबाद 42 धावांमुळे त्रिपुराची 7 धावांची आघाडी
दिशांक मिस्कीन
दिशांक मिस्कीनDainik Gomantak

Cooch Behar Trophy: गोव्याने शनिवारी सकाळच्या सत्रात 11 धावांत 3 फलंदाज गमावले, त्यामुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात त्रिपुरावर पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात त्यांना शक्य झाले नाही.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने बिनबाद 42 धावा करून जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यामुळे त्यांच्यापाशी आता सात धावांची आघाडी जमा झाली आहे.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर ‘अ’ गटातील चार दिवसीय सामना सुरू आहे. गोव्याने त्रिपुराचा पहिला डाव शुक्रवारी 180 धावांत गुंडाळला होता व पहिल्या दिवसअखेर 1 बाद 21 धावा केल्या होत्या.

शनिवारी सकाळच्या सत्रात पुंडलिक नाईक, निसर्ग नागवेकर आणि जम बसवू पाहणाऱ्या वीर यादव यांना गोव्याने झटपट गमावले.

त्यामुळे यजमान संघाची 4 बाद 63 अशी नाजूक स्थिती बनली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा गोव्याच्या 4 बाद 99 धावा झाल्या होत्या. गोव्याचा पहिला डाव 215 धावांत आटोपल्यामुळे त्यांना फक्त 35 धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले.

दिशांक मिस्कीन
Women's BBL 2023: ॲडलेड स्ट्रायकर्सने पटकावला दुसरा महिला बीबीएल किताब, फायनलमध्ये ब्रिस्बेन हीटचा उडवला धुव्वा!

दिशांकची महत्त्वपूर्ण फलंदाजी

शनिवारी दिशांक मिस्कीन याने किल्ला लढविला. त्याने संयमी फलंदाजी करताना दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. अगोदर यश कसवणकर (29) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भर टाकली.

उपाहारानंतर यश (29) लगेच बाद झाला, त्यानंतर दिशांकने दर्पण पागी (20) याच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. मात्र आघाडीसाठी १६ धावांची गरज असताना गोव्याला जबर धक्का बसला. अर्धशतक पूर्ण होताच दिशांक धावबाद झाला.

त्याने 143 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर जीवन चित्तेम (32) व कौस्तुभ पिंगुळकर (नाबाद 15) यांनी आठव्या विकेटसाठी 37 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यामुळे गोव्याला आघाडी शक्य झाली.

दिशांक मिस्कीन
WTC Updated Points Table: न्यूझीलंडला आस्मान दाखवत बांगलादेशने भारताला टाकले मागे, पाकिस्तान अव्वल स्थानी कायम!

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव ः सर्वबाद 180 व दुसरा डाव ः 8 षटकांत बिनबाद 42.

गोवा, पहिला डाव (1 बाद 21 वरून) ः 91.2 षटकांत सर्वबाद 215 (वीर यादव 40, पुंडलिक नाईक 12, निसर्ग नागवेकर 0, यश कसवणकर 29, दिशांत मिस्कीन 50, दर्पण पागी 20, जीवन चित्तेम 32, कौस्तुभ पिंगुळकर नाबाद 15, युवराज सिंग 0, शिवांक देसाई 6, अभिक पॉल 37-2, अर्कजित रॉय 78-3, सम्राट बिश्वास 31-2, सप्तजित दास 22-1, आयुष देबनाथ 10-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com