WTC Updated Points Table: न्यूझीलंडला आस्मान दाखवत बांगलादेशने भारताला टाकले मागे, पाकिस्तान अव्वल स्थानी कायम!

WTC Updated Points Table: बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करुन इतिहास रचला आहे.
Bangladesh Team
Bangladesh Team Dainik Gomantak
Published on
Updated on

WTC Updated Points Table: बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करुन इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत या विजयाचे बक्षीस संघाला मिळाले आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये बांगलादेश भारताला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर पाकिस्तान अव्वल स्थानी कायम आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सीझनची पराभवाने सुरुवात करणारा न्यूझीलंड संघ आठव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा तिसरा सीझन दक्षिण आफ्रिका वगळता सर्व संघांनी सुरु केली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली एकमेव कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे, तर बांगलादेशने न्यूझीलंडला पराभूत करुन दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आतापर्यंत WTC 2023-25 ​​मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची एकमेव मालिका खेळली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना डाव आणि 141 धावांच्या फरकाने जिंकला होता, मात्र दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारत 66.67 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या, वेस्ट इंडिज पाचव्या आणि इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे.

Bangladesh Team
IND vs AUS: विजय भारताचा, पण धक्का द. आफ्रिकेला! दिल्ली कसोटीनंतर WTC Points Table मध्ये मोठे फेरबदल

बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंड सामना कसा होता?

सिल्हट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 310 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघाने 7 धावांच्या किरकोळ आघाडीसह 317 धावा केल्या. बांगलादेशचे फलंदाज दुसऱ्या डावात चमकले. त्यांनी 338 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 332 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येसमोर किवी संघाला केवळ 181 धावांवच करता. बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला तैजुल इस्लाम. दोन्ही डावात त्याने 10 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com