Sea Turtle Conservation: कासव संवर्धन मोहिमेला मोरजी किनाऱ्यावर यश! 13,000 पिल्लांना सोडले समुद्रात

Sea Turtle Conservation: यापूर्वी दरवर्षी केवळ ६०, ५५, ४०, ३० असे सागरी कासव किनारी भागात यायचे; परंतु यंदा मोरजीत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला.
Olive Ridley Sea Turtle
Olive Ridley Sea TurtleDainik Gomantak

Sea Turtle Conservation

मागच्या २५ वर्षांपासून मोरजी किनारी भागात कासव संवर्धन मोहीम ही वन विभागातर्फे यशस्वीपणे राबवली जात आहे. यंदा येथे २१६ सागरी कासवांनी २१,००० पेक्षा जास्त अंडी घातली आणि त्यातून १३,००० पेक्षा जास्त पिल्ले याच हंगामात समुद्रात सोडण्यास सरकारला आणि कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना यश आले आहे.

यापूर्वी दरवर्षी केवळ ६०, ५५, ४०, ३० असे सागरी कासव किनारी भागात यायचे; परंतु यंदा मोरजीत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. तब्बल २१६ कासवांनी येथे अंडी घातली. या किनाऱ्यावर १९९७ सालापासून सागरी कासव मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २००० साली या कासव संवर्धन मोहिमेसाठी किनारी भागातील जागा आरक्षित करून एक चांगला पायंडा घालून दिला. या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम त्यानंतर यशस्वीपणे राबवली जाते.

कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जात असल्यामुळे मोरजी किनारा हा सायलेंट झोन म्हणून जाहीर केला. सागरी कासवांमुळे जर समुद्रकिनारा सायलेंट झाला असेल तर या पर्यटन हंगामात एकही संगीत रजनी आयोजित केली नसणार, असा सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे.

परंतु हा समज खोटा ठरवत व्यावसायिकांनी दर आठवड्याला तीन-तीन दिवस आपल्या रिसॉर्ट क्लबमध्ये संगीत रजनी आयोजित करून ध्वनिप्रदूषण केले. परंतु या ध्वनिप्रदूषणाचा कासवांवर परिणाम झाला नाही. आता तज्ज्ञांनी विचार करायला हवा की खरोखरच ध्वनिप्रदूषणामुळे कासवांवर परिणाम होत असेल तर मग शेकडो सागरी कासव अंडी घालायला त्याच किनारी भागात का येतात?

Olive Ridley Sea Turtle
Free Treatment On Varicose Veins at GMC: 'व्हेरीकोज व्हेन्स'वर ‘गोमेकॉ’त मोफत उपचार

कासव संवर्धन मोहीम अतिशय चांगली आहे. कासवांमुळे समुद्र व पर्यावरण चांगल राहते. आम्ही सर्वांनी त्यांना जपायला पाहिजे. या कासव संवर्धन मोहिमेमुळे आमच्या मोरजी गावाचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर सदोदित झळकत आहे. हजारो कासवांना जीवनदान देण्याचे काम या मोहिमेमुळे यशस्वी झाले आहे, असे गजा शेटगावकर म्हणाले.

कासव संवर्धन करणे हे अत्यावश्यक आहे; परंतु विद्यमान परिस्थिती पाहता कासव संवर्धन मोहिमेच्या नावाखाली पर्यटन व्यवसाय सरकार धोक्यात आणू पाहते की काय, हा एक ज्वलंत प्रश्न आहे. स्थानिक पातळीवर पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केलेल्या लोकांना चुकीच्या व सरकारच्या हुकूमशाही धोरणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे मांद्रेचे ॲड. अमित सावंत म्हणाले.

कासव ऑक्टोबर ते मार्चदरम्यान घरटी बांधून त्यात अंडी घालतात आणि एप्रिलअखेर ते मेपर्यंत त्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडून पिल्ले समुद्राकडे जातात. मांद्रे, मोरजी ही कासव संवर्धन तसेच पर्यटन स्थळेही आहेत. कासवांना अंडी घालताना पाहण्याची इच्छा ठेवणारे अनेकजण आहेत आणि तेथे गर्दीही होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक म्हणाले.

Edited By - निवृत्ती शिरोडकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com