Quepem News : बेफाम खनिजवाहू ट्रकांवर नियंत्रण आणा

कुडचडेवासीयांची मागणी : नियमांचे सर्रास उल्लंघन; अपघाताची भीती वाढली
Quepem
QuepemGomantak Digital Team

ई-लिलाव झालेल्या खनिज मालाची वाहतूक गेल्या दोन महिन्यांपासून कुडचडे आणि सावर्डे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र या भरधाव व बेभान वाहतुकीमुळे ट्रकचालक खनिज वाहतुकीचे नियम पाळतात की नाही, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे.

राज्यात खनिज व्यवसाय बंद पडून अकरा वर्षे उलटली आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना हा व्यवसाय लवकर सुरू झालेला हवा आहे. सध्या काही प्रमाणात ई-लिलाव झालेल्या खनिज मालाची वाहतूक सुरू आहे. परंतु काही ट्रकचालक नियमांचे उल्लंघन करून बेफामपणे वाहने हाकत असल्याने लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.

Quepem
ZHZB Review :"कुणीतरी साराला रडायला शिकवा !" विकी -साराच्या 'जरा हटके जरा बचके'वर प्रेक्षकांची प्रतिक्रिया

खनिज वाहतूक करण्यासाठी जे नियम घालून दिले आहेत, ते पाळतात की नाही हे कुणी पाहावे असा प्रश्न उपस्‍थित केला जात आहे. जास्त खेपा मिळण्‍याच्या आशेने ज्याप्रमाणे काही ट्रकचालक आपली वाहने हाकतात, ते पाहता मोठा अपघात घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी असे अपघात घडलेले आहेत.

Quepem
Colvale Jail: गॅंगवॉरनंतर कोलवाळ कारागृहात महानिरीक्षकांची धाड! 'या' गोष्टी केल्या जप्त

खनिज व्यवसाय बंद पडण्यापूर्वी सदर वाहतुकीसाठी वेगळा रस्ता करावा अशी लोकांनी मागणी केली होती व त्‍यासाठी उपोषणही केले होते. त्यावेळी मायनिंग कॉरिडॉर सुरू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या, पण नंतर व्यवसाय बंद पडल्याने ते काम तसेच राहिले, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. व्यवसाय कुणीही करावा पण लोकांच्या जीवावर उठून करू नये असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे आता काही खाणींचा लिलाव झाला आहे ते पाहता खनिज वाहतुकीसाठी वेगळा रस्ता करणे गरजेचे आहे. सदर रस्त्यासाठी सरकारने पैसे खर्च न करता लिलाव मिळालेल्‍या खाणमालकांकडून करून घ्यावा असे काकोडकर यांनी सांगितले.

Quepem
Unexplored Goa Series: मोठी बातमी! 'नॅशनल जिओग्राफिक'वर पाहायला मिळणार अनएक्सप्लोर्ड गोवा?

म्‍हणून आम्‍ही तेव्‍हा वाहतूक अडविली होती

  • कुडचडे भागातील ट्रकचालक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत कुणाल फळदेसाई यांनी सुमारे दीड लाख टन खनिज खामामळ जेटीवर उतरविण्‍याचे आश्‍‍वासन दिल्यानेच ग्रामस्‍थांनी खनिज वाहतूक करण्यास राजी झाले, अशी माहिती या भागातील लोकांनी दिली.

  • सध्या कुडचडे येथे खनिज वाहतुकीवरून दोन गट पडलेले आहेत. मंत्री नीलेश काब्राल यांचे समर्थक नगरसेवक प्रसन्न भेंडे यांनी काल खनिज वाहतूक अडविली होती.

Quepem
Goa Environmental Film Festival: ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने GEFF चा पडदा उघडणार
  • यावर खुलासा करताना या भागातील लोकांनी सांगितले, त्यावेळी काब्राल हे फक्त १० हजार टन खनिज जेटीवर उतरवू पाहत होते व ते ट्रकचालकांसाठी खूप कमी होते. त्‍यामुळे आम्‍ही वाहतूक अडविली होती.

  • आताची वाहतूक ही दीड लाख टन मालाची आहे. त्यासाठी कंत्राटदाराने सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. म्हणून आम्ही त्यांना माल उतरविण्यास आडकाठी आणली नाही. हे कंत्राट काब्राल यांना मिळाले की फळदेसाई यांना याच्याशी आमचे काहीच देणेघेणे नाही असे ट्रकचालकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com