Goa Crime: कला अकादमी कंत्राटदाराची आत्महत्या; 45 लाखांच्या थकबाकीवरून कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा

Goa Contractor Suicide 45 Lakh Dues: कंत्राटी कामाचे तब्बल ४५ लाख रुपये थकीत राहिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावाला कंटाळून बंटी प्रसाद या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे
Goa Crime News
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कंत्राटी कामाचे तब्बल ४५ लाख रुपये थकीत राहिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावाला कंटाळून बंटी प्रसाद या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे. या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या दोन प्रतिनिधींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित कंत्राटदाराला कंपनीकडून पणजी येथील कला अकादमीच्या संरचनात्मक दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम देण्यात आले होते. कंत्राटदाराने कंपनीने सोपविलेले काम पूर्ण केले. मात्र, कामाचे सुमारे ४५ लाख रुपये अद्याप देय असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Goa Crime News
Marine Biodiversity Goa: अंडी असलेल्या मादी खेकड्यांना नवजीवन! युवा मच्छीमार अर्नोल्डच्या पर्यावरणपूरक कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

थकीत रकमेच्या ताणामुळे कंत्राटदार मानसिकदृष्ट्याही त्रस्त होता, असे त्याच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. अखेर ३० जून २०२६ रोजी पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये बंटी प्रसाद याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

Goa Crime News
Goa Drug Case: थर्मासमध्ये चहा नव्हे, गांजा-चरस! कोलवाळ कारागृहात महिला सुरक्षा रक्षकच जाळ्यात; धक्कादायक प्रकार उघडकीस

भावाने केलेल्या तक्रारीनंतर पर्वरी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. थकीत देयके, कंपनीसोबतचे आर्थिक व्यवहार तसेच कंत्राटदारावर निर्माण झालेला आर्थिक व मानसिक ताण या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी बांधकाम कंपनीच्या दोन प्रतिनिधींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Morjai Temple Property Misappropriation
World Suicide Prevention Day 2026
Diocesan Society Teachers
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com