TMC: काँग्रेसचे व्हिक्टर गोन्साल्विस झाले तृणमूलवासी!

माजी आमदार आणि गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस व्हिक्टर गोन्साल्विस गोवा 'टीएमसी' मध्ये सामील
Congressman Victor Gonsalves enters Trinamool
Congressman Victor Gonsalves enters Trinamool Dainik Gomantak
Published on
Updated on

TMC: गोवा तृणमूल काँग्रेसने आज आणखी एका प्रमुख नेत्याचा, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस तथा काँग्रेसचे माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस यांचा पक्षात समावेश केला आहे. 'AITC'चे लोकसभा खासदार आणि गोव्याच्या प्रभारी श्रीमती महुआ मोईत्रा, 'AITC' राज्यसभा खासदार तथा गोवा सह-प्रभारी सुश्मिता देव आणि 'AITC' मीडिया प्रभारी ओम प्रकाश मिश्रा यांच्या पणजी येथील पक्ष कार्यालयात समावेश समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

Congressman Victor Gonsalves enters Trinamool
Goa Election 2022: मगोप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार?

समाविष्ठ झाल्यानंतर व्हिक्टर गोन्साल्विस म्हणाले, “मी काँग्रेस (Congress) सोडली आहे, कारण गोव्यात त्या पक्षाला भविष्य नाही. मी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सामील होत आहे, कारण माझा असा विश्वास आहे की नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पराभूत करू शकणारी एकमेव शक्तिशाली नेता आहे - ममता बॅनर्जी (Mamata Banejree). त्यांनी एकहाती बंगालमधील संपूर्ण भाजपच्या जुगलबंदीला हुसकावून लावले.

Congressman Victor Gonsalves enters Trinamool
काँग्रेसचे इरिनियो कुतिन्हो, भोलानाथ घाडी ‘तृणमूल’मध्ये दाखल

काँग्रेसमधील नेतृत्वाच्या संकटाचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले, “मी एक निष्ठावान काँग्रेसी होतो ,पण आज पक्षातील सदस्यांमध्ये निष्ठेचा अभाव आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत केली त्यांना पाठीशी घालण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना स्थान नाही.

पक्षात नवीन सदस्याचे स्वागत करताना,महुआ मोईत्रा म्हणाल्या की गोन्साल्विस हे गोव्यातील तृणमूल कुटुंबात एक अद्भुत जोड असतील. त्या पुढे म्हणाल्या, “आम्हाला आशा आहे की गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. गोवा तृणमूल काँग्रेस या प्रमुख नेत्याचे मनापासून स्वागत करते आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने गोवा लवकरच ‘नवी सकाळ ’ उगवेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com