MGP
MGPDainik Gomantak

Goa Election 2022: मगोप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार?

गोव्यात एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मगोपला किती जागा मिळतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
Published on

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी) आज (गुरुवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. (Goa Assembly Election 2022 MGP TMC Latest News)

MGP
'कॉंग्रेसने अकार्यक्षम मानलेले मायकल लोबो आता कार्यक्षम कसे झाले?'

गोवा निवडणुकीसाठी मागोप (MGP) आणि तृणमूल कॉंग्रेसची (TMC) युती झाली आहे. गुरुवारी मगोप आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाचा 'फॉर्म्युला' ठरण्याची शक्यता आहे. गोव्यात एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मगोपला किती जागा मिळतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

MGP
वास्कोत 43 हजार वाहनचालकांवर कारवाई; 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

तृणमूल कॉंग्रेसने (TMC) जाहीर केलेल्या 3 योजना, ‘गृहलक्ष्मी कार्ड’, ‘युवा शक्ती कार्ड’ आणि ‘म्हजे घर मालकी हक्क’ यांना मगोपचा पाठिंबा आहे. गृहलक्ष्मी कार्ड अंतर्गत, MGP-TMC सरकार सत्तेत आल्यास प्रत्येक घरातील एका महिलेच्या बँक खात्यात दरमहा 5000 रुपये थेट हस्तांतरित करेल. युवा शक्ती कार्डद्वारे गोव्यातील 18-45 वयोगटातील नागरिकांना 4 टक्के व्याजदराने 20 लाख रुपये कर्ज मिळेल. राज्यातील विधानसभा निवडणूक 14 फेब्रुवारी तर मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com