Goa Politics: गोवा फॉरवर्ड + म. गो. पक्ष = सुदिन यांना मुख्यमंत्रीपद? नवीन राजकीय समीकरण कसे असेल जाणून घ्या...

Sudin Dhavalikar: मायकल लोबो, बाबूश व विजय सरदेसाईंचा गोवा फॉरवर्ड आणि म. गो. पक्ष एकत्र येऊन एक नवे समीकरण स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तसे झाल्यास व या समीकरणाला समाधानकारक यश प्राप्त झाल्यास ज्येष्ठ नेते म्हणून सुदिनांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढू शकते.
Goa Politics: सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

मायकल लोबो, बाबूश व विजय सरदेसाईंचा गोवा फॉरवर्ड आणि म. गो. पक्ष एकत्र येऊन एक नवे समीकरण स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे.

काही लेख हे दीर्घकालीन परिणाम करणारे असतात. २३ सप्टेंबर रोजी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेला ’सुदिन अजूनही मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत?’ हा लेख याच प्रकारात मोडतो. हा लेख सुदिन यांच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच गांभीर्याने घेतला असावा असेच एकंदरीत दिसते आहे. गेली कित्येक वर्षे भळभळत असणाऱ्या त्यांच्या जखमेला वाट करून दिली म्हणूनही कदाचित असे झाले असावे.

Goa Politics: सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?
Goa Politics: पक्षांतरबंदी कायद्याचे धिंडवडे! 'दोन तृतीयांश’ची पळवाट सर्वांच्याच पथ्थ्यावर; संपादकीय

सुदिन हे मडकई मतदारसंघाचे अनभिषिक्त सम्राट आहेत, यात दुमत असण्याचे कारणच नाही. गेली पंचवीस वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याचबरोबर दर निवडणुकीला ते वाढत्या मताधिक्याने निवडूनही येत आहेत. पण एवढे असूनसुद्धा ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. फोंडा तालुक्यातून निवडून येऊन मुख्यमंत्री होणारे एकमेव आमदार म्हणजे रवि नाईक. विशेष म्हणजे ते त्यावेळी फोंड्यातून नव्हे तर मडकईतून निवडून आले होते. सुदिन यांच्या कार्यकर्त्यांच्या व्यथेमागे हेही एक कारण असू शकते. आता त्यांची ही जखम नवीन नाही. वर नमूद केलेल्या लेखाने या जखमेला मूर्त स्वरूप दिले आहे एवढेच. आता अजूनपर्यंत सुदिन मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, हे जरी खरे असले तरी याचा अर्थ ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा होत नाही.

‘उम्मीद पे दुनिया’ नेहमीच कायम असते. आणि गोव्याच्या राजकारणात तर आशेला नेहमीच वाव असतो. यामुळेच सध्या सुदिन यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ते २०२७साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर. या निवडणुकीला जरी दोन वर्षे असली तरी संभाव्य समीकरणाच्या माळा आतापासूनच गुंफायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक म.गो. पक्ष व खास करून सुदिन यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. सध्या म. गो. पक्ष सरकारचा घटक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते भाजपशी युती करून लढवू शकतात. पण असे झाल्यास परत एकदा म. गो. दोन किंवा तीन जागांपलीकडे जाऊ शकणार नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत म. गो.ने तृणमूलशी युती केली होती. युती होऊनही म. गो.च्या पदरी फक्त दोनच जागा पडल्या होत्या. पण हे विश्लेषण अर्धसत्य ठरू शकते. तसे पाहायला गेल्यास म. गो.च्या तीन जागा अगदी कमी मताधिक्याने गेल्या होत्या. त्यात परत मये व पेडणे मतदारसंघातील म. गो.चे उमेदवार भाजपने ’हायजॅक’ केल्यामुळे त्यांची अधिकच पंचायत झाली होती. मये येथील प्रेमेन्द्र शेट व पेडण्याचे प्रवीण आर्लेकर निवडून आल्यामुळे म. गो.चे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो.

Goa Politics: सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?
Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

आता हुकलेल्या तीन जागा, भाजपने काबीज केलेल्या दोन जागा व निवडून आलेल्या दोन जागा याचा हिशेब केल्यास म. गो. सात जागांपर्यंत पोहोचू शकला असता. पण तृणमूलशी केलेली सोयरीक त्यांच्या अंगलट आली असेच म्हणावे लागेल. अर्थात जरतरच्या समीकरणांना राजकारणात अर्थ नसतो हे जरी खरे असले तरी भूतकाळाचा आढावा घेतल्याशिवाय भविष्यकाळात डोकावता येत नाही हे त्याहून अधिक खरे आहे.

आता सात जागा आल्या असत्या तर म. गो. पक्ष निर्णायक ठरू शकला असता. गोव्यासारख्या छोट्या राज्यात सात जागांनासुद्धा खूपच महत्त्व असते. त्यामुळे मग सुदिन यांना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त होऊ शकली असती. याच करता आता म. गो.ने निवडणूक स्वतंत्र लढवावी की एखाद्या पक्षाशी युती करून लढवावी, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

भाजपशी युती केल्यास वर्ष २०१२ प्रमाणे म. गो.ला दोन किंवा तीन जागा मिळू शकतील. त्यामुळे मग सुदिन यांना परत एकदा फक्त मंत्रिपदावरच समाधान मानावे लागेल. स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असल्यास पक्षाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पण सध्या म. गो. पक्ष सरकारात असल्यामुळे त्यांना आक्रमक भूमिका घेणे कठीण जाऊ शकते.

कॉंग्रेसबरोबर युती करणे हाही एक पर्याय ठरू शकतो. पण दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्यामुळे हा पर्याय व्यवहार्य ठरू शकेल की काय हे आताच सांगता येत नाही. याचबरोबर २०१९साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत म. गो.ने कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता हे विसरता येत नाही. त्याचप्रमाणे सध्या एका वेगळ्याच युतीचे निनाद वाजायला सुरुवात झाली आहे.

मायकल लोबो, बाबूश व विजय सरदेसाईंचा गोवा फॉरवर्ड आणि म. गो. पक्ष एकत्र येऊन एक नवे समीकरण स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तसे झाल्यास व या समीकरणाला समाधानकारक यश प्राप्त झाल्यास ज्येष्ठ नेते म्हणून सुदिनांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढू शकते.

अर्थात त्याकरता म. गो.ला समाधानकारक यश मिळायला हवे हेही तेवढेच खरे आहे. या आघाडीबद्दल सध्या छातीठोकपणे बोलणे कठीण असले तरी अशी आघाडी झाल्यास ही निवडणुकीच्या तोंडावरच होऊ शकते एवढे मात्र निश्चित आहे. याचा अर्थ अजूनही सुदिन व म. गो. पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुदिन यांच्याजवळ कार्यक्षमतेबरोबर धूर्तताही असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहेच. या ’संगमा’चा वापर केल्यास सुदिन यांना मुख्यमंत्रिपदाबाबत ’दिल्ली’ दूर राहणार नाही. आता हे प्रत्यक्षात उतरते की काय, याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल एवढे निश्चित.

Goa Politics: सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?
Goa Politics: ''...जमिनीच्या दलालीत भाजपला रस, खासगी विद्यापीठांचा गोमंतकीयांना फायदा नाही''; युरींचा हल्लाबोल!

गेल्या विधानसभा निवडणुकीत म. गो.ने तृणमूलशी युती केली होती. युती होऊनही म. गो.च्या पदरी फक्त दोनच जागा पडल्या होत्या. पण हे विश्लेषण अर्धसत्य ठरू शकते. तसे पाहायला गेल्यास म. गो.च्या तीन जागा अगदी कमी मताधिक्याने गेल्या होत्या. त्यात परत मये व पेडणे मतदारसंघातील म. गो.चे उमेदवार भाजपने ’हायजॅक’ केल्यामुळे त्यांची अधिकच पंचायत झाली होती. मये येथील प्रेमेन्द्र शेट व पेडण्याचे प्रवीण आर्लेकर निवडून आल्यामुळे म. गो.चे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो.

आता हुकलेल्या तीन जागा, भाजपने काबीज केलेल्या दोन जागा व निवडून आलेल्या दोन जागा याचा हिशेब केल्यास म. गो. सात जागांपर्यंत पोहोचू शकला असता. पण तृणमूलशी केलेली सोयरीक त्यांच्या अंगलट आली असेच म्हणावे लागेल. अर्थात जरतरच्या समीकरणांना राजकारणात अर्थ नसतो हे जरी खरे असले तरी भूतकाळाचा आढावा घेतल्याशिवाय भविष्यकाळात डोकावता येत नाही हे त्याहून अधिक खरे आहे.

आता सात जागा आल्या असत्या तर म. गो. पक्ष निर्णायक ठरू शकला असता. गोव्यासारख्या छोट्या राज्यात सात जागांनासुद्धा खूपच महत्त्व असते. त्यामुळे मग सुदिन यांना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त होऊ शकली असती. याच करता आता म. गो.ने निवडणूक स्वतंत्र लढवावी की एखाद्या पक्षाशी युती करून लढवावी, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपशी युती केल्यास वर्ष २०१२प्रमाणे म. गो.ला दोन किंवा तीन जागा मिळू शकतील. त्यामुळे मग सुदिन यांना परत एकदा फक्त मंत्रिपदावरच समाधान मानावे लागेल.

स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असल्यास पक्षाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पण सध्या म. गो. पक्ष सरकारात असल्यामुळे त्यांना आक्रमक भूमिका घेणे कठीण जाऊ शकते. कॉंग्रेसबरोबर युती करणे हाही एक पर्याय ठरू शकतो. पण दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्यामुळे हा पर्याय व्यवहार्य ठरू शकेल की काय हे आताच सांगता येत नाही. याचबरोबर २०१९साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत म. गो.ने कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता हे विसरता येत नाही. त्याचप्रमाणे सध्या एका वेगळ्याच युतीचे निनाद वाजायला सुरुवात झाली आहे.

मायकल लोबो, बाबूश व विजय सरदेसाईंचा गोवा फॉरवर्ड आणि म. गो. पक्ष एकत्र येऊन एक नवे समीकरण स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तसे झाल्यास व या समीकरणाला समाधानकारक यश प्राप्त झाल्यास ज्येष्ठ नेते म्हणून सुदिनांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढू शकते. अर्थात त्याकरता म. गो.ला समाधानकारक यश मिळायला हवे हेही तेवढेच खरे आहे. या आघाडीबद्दल सध्या छातीठोकपणे बोलणे कठीण असले तरी अशी आघाडी झाल्यास ही निवडणुकीच्या तोंडावरच होऊ शकते एवढे मात्र निश्चित आहे. याचा अर्थ अजूनही सुदिन व म. गो. पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुदिन यांच्याजवळ कार्यक्षमतेबरोबर धूर्तताही असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहेच. या ’संगमा’चा वापर केल्यास सुदिन यांना मुख्यमंत्रिपदाबाबत ’दिल्ली’ दूर राहणार नाही. आता हे प्रत्यक्षात उतरते की काय, याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल एवढे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com