Goa State Government: जिंदाल, अदानी, अगरवालांच्या इशाऱ्यावर चालतेय राज्य सरकार; अमित पाटकर

Goa State Government: काँग्रेसची टीका: वाहतूक संचालकांनी काढला पळ
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa State Government: क्रोनी भांडवलदारांकडून वाहतूक करापोटी राज्य सरकारचे थकीत असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या वसुलीविषयी काँग्रेस शिष्टमंडळ मंगळवारी वाहतूक खात्याचे संचालकांना भेटण्यासाठी आले होते.

Amit Patkar
Goa News: 41 वर्षांनंतर अमीरभाईंनी पाहिले मुलांचे चेहरे

परंतु शिष्टमंडळाचे म्हणणे न ऐकताच वाहतूक खात्याचे संचालक प्रभारी आयएएस पोलुमातला अभिषेक यांनी केबिनबाहेर पडण्याचे धोरण अवलंबल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप सरकारवर टीकास्र सोडले.

जिंदाल, अदानी आणि अगरवाल यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. शिष्टमंडळात विजय भिके, श्रीनिवास खलप, विरेन शिरोडकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वाहतूक खात्याचे संचालक पोलुमातला अभिषेक केबिन बाहेर पडल्यानंतर पाटकर यांनी कार्यालयाच्या आवारात पत्रकार परिषद घेतली.

बड्या उद्योगपतीची बाजू...

2013 च्या हरित कर कायद्यान्वये राज्य सरकारला थकीत वसुली करण्याचा सर्व अधिकार आहे. अदानी समूहाकडून 2014 ते आत्तापर्यंत हरित कर वसूल करण्यासाठी एकही पाऊल उचलेल नाही.

प्रलंबित थकबाकी वसूल न करून परिवहन विभाग बड्या उद्योगपतींची बाजू घेत असल्याचा आणि गोव्यातील सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचा आरोप अमित पाटकर यांनी केला आहे. तसेच प्रलंबित थकबाकी तातडीने वसूल करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com