Goa News: 41 वर्षांनंतर अमीरभाईंनी पाहिले मुलांचे चेहरे

Goa News: पिता-पुत्रांची अखेर भेट: घरचा पत्ता विसरल्याने भरकटले होते
Goa News
Goa NewsDainik Gomantak

प्रदीप नाईक

Goa News: घरचा पत्ता विसरल्याने मागची 41 वर्षे भरकटत असलेल्या गुजरात येथील अमीरभाई सागरीया या 81वर्षीय वृद्ध इसमाची शेवटी आज कुटुंबीयांशी भेट झाली. ही भेट घडवून आणण्यास डॉक्टर मेहुल शुक्ला यांना यश आले.

Goa News
Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचा मृत्यू कसा झाला, शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

41 वर्षांपासून ते गोव्यात होते पण घरचा पत्ता विसरल्याने भटकत राहिले होते. त्याच अवस्थेत ते बायणा वास्को येथे पोहोचले असता, तेथील एका मुस्लीम कुटुंबाने त्यांना आसरा दिला होता.सोमवारी रात्री त्यांचा मोठा मुलगा युसुफ आणि छोटा मुलगा गनी विमानातून गोव्यात पोचले व त्यांनी आपल्या वडिलांची भेट घेतली.

गुजरात येथील अमीरभाई कित्येक वर्षांपूर्वी गोव्यात आले होते. त्यानी आपले बस्थान वास्को येथे ‘श्रीधर’ नामक इमारतीत केले.

वास्कोत कित्येक वर्षे साफसफाई व इतर कामे करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. ४१ वर्षापूर्वी गुजरात येथील अमीर भाई गोव्यात पोचल्यानंतर काही मानसिक कारणामुळे ते घरचा पत्ता विसरले होते. सोमवारी रात्री अमीरभाई याचा मोठा मुलगा युसुफ आणि छोटा मुलगा गनी विमानातून गोव्यात पोचल्यानंतर मंगळवारी (ता. ९) ते बेपत्ता असलेल्या वडिलांना भेटले असून लवकरच ते त्यांच्या वडिलांना घेऊन गुजरात येथील सुरेंद्रनगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com