Goa Student: विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहणे आवश्‍यक

Goa Student: डॉ. मनस्वी कामत : 42 विद्यार्थ्यांचा ‘उद्याचा आदर्श नागरिक’ उपाधीने केला गौरव
Goa Student
Goa StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Student: विद्यार्थ्यांनी नकारात्मक गोष्टींकडे न वळता, मनाला सकारात्मक गोष्टींतून शिक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण आपली वर्तणूक वाढवते. तसेच मोबाईल, टीव्ही आपले प्राधान्य नसून या गोष्टींपासून दूर राहणे हिताचे ठरेल, असा मार्गदर्शनपर सल्ला एमईएस कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.मनस्वी कामत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Goa Student
54 IFFI Goa: ‘सुवर्ण मयूर’साठी नामांकन मिळणेच मोठे; ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी

सम्राट क्लब वास्को आयोजित "सम्राट स्टुडंट फाउंडेशन डे" कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रवींद्र भवन बायणा येथील मिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुरगाव व सासष्टी तालुक्यातील एकूण ४२ विद्यार्थ्यांचा "उद्याचा आदर्श नागरिक" या उपाधीने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सम्राट क्लब वास्कोच्या अध्यक्षा संध्या संझगिरी, माजी अध्यक्ष जयराम पेडणेकर, सचिव गिरीश कोळमकर, खजिनदार स्नेहल संझगिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मिताली चौहान हीने ईशस्तवन गायिले. संध्या संझगिरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयराम पेडणेकर यांनी या पुरस्कार प्रदान सोहळ्याचा हेतू स्पष्ट केला.

Goa Student
Goa IFFI 2023: ‘द फेदरवेट’ : कठोर परिश्रमाचे फळ

पुरस्कार प्राप्त झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : अर्थव केरकर (विद्या विहार हायस्कूल, ठाणा-कुठ्ठाळी), कॄतिका मेश्राम (रेजिनामुंडी हायस्कूल, चिखली), साईदानायर (अंजुमन हिमायतूल इस्लामिक हायस्कूल, बायणा), आरोही तारी (सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट), सेजल गुप्ता (सेंट अॅण्ड्यू इन्स्टिट्यूट),

प्रथम भोसले (मुरगाव हायस्कूल, हेडलॅण्ड सडा), प्रथमेश साळुंखे (माता सेकंडरी स्कूल नं-१, बायणा), आचल घाडी (शांतादुर्गा हायस्कूल, सांकवाळ), सिध्दी धारगळकर (दिप विहार हायस्कूल, हेडलॅण्ड सडा), समिधा गावस (म्युनिसिपल हायस्कूल, वास्को), श्रावणी राऊत (विद्या मंदिर हायस्कूल, आदर्शनगर चिखली), बेर्नास पेरेरा (अवर लेडी ऑफ लॉर्डेस हायस्कूल, उतोर्डा), कुमारी रिया मिश्रा (युवक संघ हायस्कूल, हेडलॅण्ड सडा), आशा पांडे (अवर लेडी ऑफ कांदेलेरीया हायस्कूल, बायणा), रेखा थापा (सरकारी शाळा (मेन) वास्को),

अंकुश सिंग (केशव स्मृती हायस्कूल, आल्तो दाबोळी) , प्रीती हरीजन (सरकारी हायस्कूल, वाडेनगर), यत्लुम्मा बरमगौडर (सरकारी हायस्कूल, मांगोरहील), रेणुका मांद्रेकर (सरकारी हायस्कूल, नवेवाडे), सन्मेश मदार (श्री यल्ललिंगेश्वर शारदा मंदिर हायस्कूल, झरी झुआरीनगर), श्रीधर कलीगुड्डा (सरकारी हायस्कूल, झुआरीनगर), आशी कुडाळकर (मदर ऑफ मर्सी इंग्लिश हायस्कूल, मेर्सिस वाडे), मधुश्री कर्डेकर (अवर लेडी ऑफ देस्तेरो हायस्कूल, देस्तेरो),

सलोनी नाईक (वाडेनगर इंग्लीश हायस्कूल, नवेवाडे), विराज मल्लाह (सरकारी हायस्कूल-बायणा), सुजाता मल्लाह (श्री सुसेनाश्रम विद्यालय, जेटीमुरगाव), हसिना खातून (अमेनिया हायस्कूल, बायणा इस्लामपूर),

रीटा मुखर्जी (अवरलेडी ऑफ पर्पएच्यूअल हायस्कूल, कुठ्ठाळी ), दएक्लआन वाझ (सेंट थॉमस हायस्कूल, कासावली), जोयलीशा डिसा (सेंट जोसेफ वाझ हायस्कूल, सांकवाळ-कुठ्ठाळी), अफ्रिना नदाफ (लेफ्ट. नरेंद्र मयेकर सरकारी हायस्कूल, सडा),

कविता पुजारी (श्री यल्ललिंगेश्वर शारदा मंदिर, सासमोळे-बायणा), वियम्मा कारव्हाल्हो (सेवियर ऑफ द वर्ल्ड), अनुश्री चोडणकर (फादर आग्नेल मल्टीपर्पज हायस्कूल, वेर्णा), रायझा रेगो (मरीना इंग्लिश हायस्कूल -वेर्णा), झियोन गोदिन्हों (अवर लेडी ऑफ सुकोर हायस्कूल), साईश जाधव (एअरवे पब्लिक स्कूल, विद्यानगर

सांकवाळ).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com