काँग्रेसने आधी विरोधीपक्षनेता ठरवावा, तानावडेंचं आव्हान

काँग्रेसने भाजपच्या सभागृह नेत्याची चिंता करु नये, भाजपचा टोला
Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet Tanavade
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने सत्तास्थापनेसाठी विलंब केल्याने काँग्रेसने पत्रकार परिषद घेत निशाणा साधला होता. मात्र याला भाजप नेत्यांनी चांगलंच गांभीर्याने घेतल्याचं चित्र आहे. चार आमदारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने आधी त्यांचा विरोधीपक्ष नेता ठरवावा मग भाजपवर आरोप करावेत, असा टोला तानावडेंनी लगावला आहे.

Sadanand Shet Tanavade
'मी भाजपात जाणार ही केवळ अफवा, गोवा फॉरवर्डचा त्याग आठवा'

काँग्रेसने भाजपच्या सभागृह नेत्याची चिंता करु नये. त्यांनी त्यांचा विरोधीपक्षनेता जाहीर करावा, असं थेट आव्हान तानावडेंनी काँग्रेस नेत्यांना दिलं आहे. तसंच काँग्रेसकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर भाजपला विनाकारण लक्ष्य करण्याची नामुष्की ओढवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दिगंबर कामतांना पत्रकार परिषदेत त्यांचंच प्रसिद्धीपत्रक वाचताना होत असलेली तारांबळ पाहून गंमत वाटली, असं ट्वीटही तानावडे यांनी केलं आहे.

सदानंद शेट तानावडे यांनी ट्विट करताच काँग्रेसच्या वरद म्हार्दोळकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. जर भाजपमध्ये (BJP) सारंकाही आलबेल असेल तर त्यांनी जाहीर करावं की प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे एकत्र दिल्लीला का गेलेत?. यासोबतच अमरनाथ पणजीकर यांनीही तानावडेंच्या ट्विटवर विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यातील मतभेदांवरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे बिना नाईक यांनी तर भाजप सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असेल, तर त्यांनी इतरांना सरकार स्थापनेची संधी द्यावी, असं आवाहन केलं आहे.

Sadanand Shet Tanavade
गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपमध्ये संभ्रम कायम

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. भाजप सरकार स्थापनेत अपयशी ठरलं आहे, कारण त्यांच्या पक्षात सारंकाही आलबेल नाही, असा आरोप कामतांनी केला होता. दुसरीकडे मायकल लोबो यांनी तर भाजपला सरकार स्थापन करण्यात अडचणी येत असतील तर काँग्रेस (Congress) त्यासाठी तयार असल्याचा दावा केला होता. आता तानावडेंनी कामतांना सल्ला दिलाय, ते म्हणाले की दिगंबर कामतांनी देव दामोदरासमोर शपथ घ्यावी मडगावच्या विकासासाठी काम करणार आणि 27 वर्षांपासून सुरु असलेल्या हालातून मडगावकरांची सुटका करणार. तसंच खोटारडेपणा करुन मडगाववासियांची दिशाभूल करणार नाही, अशी कामतांनी शपथ घ्यावी असा टोला तानावडेंनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com