Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Yoga Day RTI Details: आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केला.
Goa Yoga Day RTI Details
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केला. त्या खर्चाविषयी आरटीआयद्वारे मागितलेला तपशील क्रीडा व युवक कल्याण खात्याने दिला नाही. त्याविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी खात्याचे संचालक अजय गावडे यांना घेराव घातला आणि जाब विचारला.

त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर केले. कांपाल येथील क्रीडा खात्याच्या कार्यालयात सायंकाळी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे अर्चित नाईक, जनार्दन भंडारी, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिक्षा खलप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिष्टमंडळ पोहोचले.

Goa Yoga Day RTI Details
Goa Congress: दोन-तृतीयांश संख्याबळ पुरेसे की पक्ष संमती हवी? डिसेंबरमध्ये अंतिम 'सुप्रीम' सुनावणी

याशिवाय याप्रसंगी प्रतिमा कुतिन्हो, गजानन तिळवे, विरेंद्र शिरोडकर, योगेश गोवेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी पणजीकर यांनी गावडे यांना सांगितले की, प्रत्येक सरकारी कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची लूट करण्याची संधी भाजप सरकार शोधत आहे. राज्यभर झालेल्या कार्यक्रमाची महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात संचालनालय अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.

काही काळ वातावरण तंग

काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी गावडे यांच्याभोवती कडे केले. कार्यालयात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्याशिवाय या कार्यकर्त्यांनी गावडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना यावेळी सूत्रे हाती घ्यावी लागली. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळ वातावरण तंगच राहिले.

Goa Yoga Day RTI Details
Congress on Exam Paper Leak: 10 वर्षांत 152 पेपरफुटीचे प्रकार, आरोपींना भाजपचे अभय; चोडणकरांची जोरदार टीका

‘तू काय मला नोकरी दिली काय?’ : गावडे

शिष्टमंडळाने कार्यालयात आक्रमक भूमिका घेतली. त्यातच कुतिन्हो यांनी गावडे यांना राजीनामा द्या, अशी मागणी केली. त्यावर गावडे आक्रमक झाले. ‘तू काय मला नोकरी दिली काय?’ असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे कुतिन्हो आणखी आक्रमक झाल्या. त्याशिवाय गावडे हे उठून उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आणि परिस्थिती शांत केली. त्यानंतर गावडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्या कार्यक्रमाची खर्चाची फाईल अजून पुढे गेलेलीच नाही. क्रीडा खाते मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे काम करीत आहे. कोणाला काहीही म्हणायचे असेल, ते म्हणत होते; पण आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे, असे गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com