Mallikarjun Kharge to Attend Goa Statehood Day Celebrations on 30th May
Amit Patkar | Yuri Alemao | Mallikarjun KhargeDainik Gomantak

Mallikarjun Kharge Goa Visit: गोवा राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लावणार हजेरी

Goa Statehood Day: पाटकर, आलेमाव आणि खर्गे यांच्यात झालेल्या बैठकीत गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली.
Published on

पणजी: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ३० मे २०२५ रोजी होणाऱ्या गोवा राज्य स्थापना दिन समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बेंगळुरूमध्ये खर्गे यांची भेट घेऊन समारंभासाठी हजर राहण्यासाठी आमंत्रण दिले. खर्गे यांनी हे आमंत्रण स्वीकारल्याची माहिती पाटकरांनी दिली आहे.

पाटकर, आलेमाव आणि खर्गे यांच्यात झालेल्या बैठकीत गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली.

Mallikarjun Kharge to Attend Goa Statehood Day Celebrations on 30th May
Goa Rain: घरावर झाड कोसळून महिला जखमी, वाहनांचा चुराडा, मुरगाव बंदरातील कामकाज ठप्प; गोव्यात पावसाचे धुमशान सुरुच

"२०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकांसाठीचा कार्ययोजना (रोडमॅप) विस्तृतपणे मांडण्यात आला. काँग्रेसचे संघटन स्थानिक स्तरावर बळकट करण्यावर भर देत, भाजपला पर्याय ठरेल असा विश्वासार्ह व जनता केंद्री पर्याय सादर करण्यावर भर देण्यात आला", अशी माहिती पाटकरांनी दिली आहे.

"खर्गे यांचा गोवा दौरा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण करेल व संपूर्ण काँग्रेस संघटनात आत्मविश्वास वाढवेल", असे पाटकर यांनी सांगितले.

Mallikarjun Kharge to Attend Goa Statehood Day Celebrations on 30th May
Goa Politics: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे टेन्शन वाढलं; मडगावसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला? दत्ता नायक यांच्या मुलाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

"गोव्याचे भविष्यासाठी पुन्हा चळवळ आता सुरू झाली आहे. आम्ही एकसंघ आहोत, ठाम आहोत आणि भाजपला थेट सामोरे जाण्यास पूर्णतः सज्ज आहोत. गोवा प्रदेश काँग्रेस समिती मल्लिकार्जुन खर्गे यांचे राज्य स्थापना दिन समारंभात स्वागत करण्यास उत्सुक आहे", असे पाटकरांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com