Goa Congress : काँग्रेस पक्षातील गटातटातील धुसफुस अखेर प्रभारी माणिकम टागोर यांच्यासमोर आली. सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पाठविलेल्या नोटिसा या धुसफुशीला कारणीभूत ठरल्या. त्यामुळे पक्षांतर्गत सुरु असलेल्या लाथाळ्यांना लगाम घालण्याचे काम टागोर यांच्यासमोर ठाकले आहे.
काँग्रेसमध्ये अमित पाटकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे दोन गट असल्याचे यापूर्वीपासून दिसून आले आहे. अमित पाटकर हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी घेऊन पक्षात आले. परंतु पराभूत झाल्यानंतर त्यांच्याकडे राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे चोडणकर गटातील अनेकजण नाराज होते. परंतु राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर दोन्ही गट एकत्र आल्याचे दाखविण्यात आले. परंतु अंतर्गत धुसफुस कायम राहिली.
विधानसभा निवडणुकीनंतर आर्थिक व्यवहारावरून पक्षात धुसफूस झाली. त्या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या शिस्तपालन समितीतर्फे निलंबित झालेल्यांची चौकशी सुरु झाली नाही. त्यामुळे टागोर यांची कार्यकारी बैठकवेळी त्या कार्यकत्यांनी भेट घेतली. जनार्दन भंडारी, विकास प्रभुदेसाई यांनी टागोर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. टागोर यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पाटकर यांना काही सूचना केल्या आहेत.
पक्षांतर्गत जी कार्यवाही सुरु आहे ती घटनात्मक आहे. आपणास विचारणा न करता काही वर्तमान पत्रांनी (दै. गोमन्तक सोडून) आपली प्रतिक्रिया प्रसिद्ध करून पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. त्याबाबत पक्ष संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ''गोमन्तक '' ला दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.