Sadanand Shet Tanawade: साहूंकडे 210 कोटी आले कुठून?: तानावडे

Sadanand Shet Tanawade: कॉंग्रेस आणि गैरव्यवहार, असे समीकरण झाले आहे. गैरव्यवहाराशिवाय कॉंग्रेसवाले राहू शकत नाहीत; तानावडे
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Shet Tanawade: कॉंग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेले 210 कोटी रुपये आले कुठून याचा जाब राहुल गांधी यांनी द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवक्ते ॲड. यतीश नाईक होते.

Sadanand Shet Tanawade
Mickey Restaurant: कोलवात बेकायदेशीर ‘मिकीज’ अद्याप सुरूच

तानावडे म्हणाले, कॉंग्रेस आणि गैरव्यवहार, असे समीकरण झाले आहे. गैरव्यवहाराशिवाय कॉंग्रेसवाले राहू शकत नाहीत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत साहू सक्रिय होते. झारखंडसह इतर ठिकाणी यात्रेची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यामुळे राहुल यांनी एवढे पैसे एका खासदाराकडे आले कुठून याचे उत्तर दिले पाहिजे.

Sadanand Shet Tanawade
Mardol Police Station: 6 महिन्यांत म्हार्दोळ पोलिस स्थानकावर तिसरा निरीक्षक

कॉंग्रेसच्या नेत्यांची संपत्ती तपासली तर अशा अनेक गोष्टी उघड होतील. पूर्वी त्यांनी केलेले असे प्रकार पचून जात होते. आता खाणार नाही, खाऊ देणार नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते या सगळ्या प्रकारांच्या मुळाशी जातील. मोदी यांच्या सरकारमुळेच अलीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांकडून बेहिशेबी मालमत्ता जप्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तिकर खाते, सीबीआय आदी तपास यंत्रणांनी छापे टाकले की विरोधकांकडून राजकीय सूड उगवण्यात येत असल्याचा बिनबुडाचा आरोप केला जातो. प्रत्यक्षात भाजप विरोधी राजकीय नेते अशा गैरकृत्यांमध्ये आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. गैरव्यवहार झाला नाही तर झारखंडमधील साहू यांच्याकडे २१० कोटी रुपये आले कुठून याचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com