Mickey Restaurant: कोलवात बेकायदेशीर ‘मिकीज’ अद्याप सुरूच

Mickey Restaurant: सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर : किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने पाडण्‍याचा दिला होता आदेश
Mickey Restaurant
Mickey Restaurant Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Mickey Restaurant: सीआरझेड कायद्याचा भंग करून उभारलेले कोलवा येथील मिकीज रेस्‍टॉरन्‍ट पाडण्‍याच्‍या गोवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या आदेशावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले असले, तरी हे बेकायदा रेस्‍टॉरन्‍ट अजूनही सुरूच असून तिथे धुमधडाक्‍यात पार्ट्या सुरूच आहेत. त्‍यामुळे या रेस्‍टाॅरन्‍टमालकाने सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेशही धुडकावल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

Mickey Restaurant
Noise Pollution: किनारी भागात पार्ट्यांची धूम; ‘प्रदूषण नियंत्रण’ दुबळे

मिकीज रेस्‍टॉरन्‍ट हे सीआरझेड कायद्यानुसार विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभे केल्‍याने ते पाडण्‍याचा आदेश यापूर्वी प्राधिकरणाने दिला होता. या आदेशावर नंतर उच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले होते. रेस्‍टॉरन्‍ट मालकाने या आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले हाेते. मात्र, नोव्‍हेंबर महिन्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने हा आव्‍हान अर्ज फेटाळून लावताना प्राधिकरणाच्‍या आदेशावर मोहोर उठविली होती.

मात्र, हे रेस्‍टॉरन्‍ट स्‍वत: पाडू, असे रेस्‍टॉरन्‍टमालकाने स्वत:च सांगितल्‍यानंतर त्‍यासाठी चार महिन्‍यांचा कालावधी दिला हाेता. मात्र, बाकीचा आदेश आहे तसाच कायम ठेवला

होता. यासंबंधी प्राधिकरणाचे सदस्‍य सचिव लेविन्‍सन मार्टिन्‍स आणि वरिष्‍ठ अधिकारी संजीव जाेगळेकर यांच्‍याकडे लेखी तक्रार देऊनही ‘आम्‍ही याेग्‍य ती कारवाई करू’ असे आपल्‍याला कळविण्‍यात आले. मात्र, अजूनही प्राधिकरणाने या बांधकामाबाबत काहीच हालचाल केलेली नाही, असे मूळ याचिकादार कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या अध्‍यक्ष ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी सांगितले.

प्राधिकरणाकडूनही बोळवण : ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे लक्ष वेधूनही ‘आम्‍ही योग्‍य ती कारवाई करू’, अशा शब्दांत त्‍यांची बोळवण करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. वास्‍तविक सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश आल्‍यानंतर दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासनाने हे रेस्‍टॉरंट सील करून त्‍याचा पाणीपुरवठा आणि वीजप्रवाह बंद करण्‍याची गरज होती, असे ‍मे त्या म्हणाल्या.

सवलतीचा घेतला गैरफायदा

यासंबंधी कोलवा सिव्हीक फोरमच्या ज्‍युडिथ आल्‍मेदा म्‍हणाल्‍या, मूळ आदेशाप्रमाणे येथील व्‍यावसायिक काम 15 दिवसांत बंद करण्‍याचा आदेश दिला होता. त्‍यामुळे सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाची लगेच अंमलबजावणी होणे आवश्‍‍यक होते. जाे चार महिन्‍यांचा कालावधी दिला आहे तो बांधकाम पाडण्‍यासाठी, रेस्‍टॉरन्‍ट चालविण्‍यासाठी नव्‍हे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com