Goa Congress: ठाकरेंच्या उपस्थितीत आज काँग्रेसच्या बैठका

Goa Congress: काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे उद्या, बुधवारी गोव्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
Goa congress
Goa congressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Congress:

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे उद्या, बुधवारी गोव्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दुपारनंतर रात्री-उशिरापर्यंत त्यांच्या बैठकांचा सिलसिला चालू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसला दोन्ही जागा अपेक्षेप्रमाणे मिळालेल्या आहेत.

त्यामुळे दक्षिणेतील जागेवर काँग्रेस मजबूत मानला जात आहे, परंतु गत निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पडलेली

मते व भाजपाला पडलेली मते पाहता लोकसभेचा विचार केला, तर फारशी मोठी तफावत नाही. त्यामुळेच भाजप आम्ही ही जागा यावेळी जिंकणार म्हणून ठामपणे सांगत आहे. उत्तर गोव्याचा भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे जी नावे छाननी समितीतून गेली आहेत, त्या अनुषंगानेही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Goa congress
Anjuna Beach: हणजूण किनारपट्टीतील 114 आस्थापनांना टाळे

दक्षिण गोव्याचा विचार केला, तर काँग्रेसला ही जागा आपल्याकडे ठेवायची झाल्यास ख्रिश्‍चन समुदायाला मतदानासाठी कार्यकर्त्यांना बाहेर काढावे लागणार आहे, हे पक्षश्रेष्ठींना उमगले आहे. या सर्वांचा विचार करून सध्या काँग्रेस कामाला लागली आहे.

काँग्रेस प्रभारी ठाकरे यांच्या मागील दौऱ्यात दिलेल्या कार्यक्रमानुसार बूथ जोडो अभियान पक्षाने राबविले आहे. उद्या, बुधवारी ते बुथजोडो अभियानाचा आढावा, पक्षाच्या आमदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

Goa congress
Lok Sabha Election: दक्षिणेत गोमंतकीय महिलाच उमेदवार

राज्य निवडणूक समितीच्या सदस्यांशीही चर्चा ते करतील. त्याशिवाय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, अशीही माहिती मिळाली आहे.

इतर पक्षांच्या नेत्यांशीही साधणार संवाद

उद्या बुधवारी संध्याकाळच्या सत्रात भाजपविरोधी व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांशी ते चर्चा करतील. त्यात आम आदमी पक्षाचे नेते व आमदार, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांशी ते बैठक घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com