Rajesh Faldesai
Rajesh FaldesaiDainik Gomantak

...त्यावेळी तर मी झोपलो होतो; राजेश फळदेसाईंचे राजकीय घडामोडींवर अजब विधान

काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीबद्दल मला काहीच माहीत नव्हते; राजेश फळदेसाई
Published on

गोव्यात काँग्रेसचे आमदार फुटून भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान प्रत्येक आमदार आपापली बाजू स्पष्ट करत आहे. यावेळी काँग्रेस नेते राजेश फळदेसाई यांच्या विधानाने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Rajesh Faldesai
'भाजप मोठा पक्ष; सर्वांचं पक्षात स्वागत'

काँग्रेसच्या बैठकांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीबद्दल मला काहीच माहीत नव्हते. पण मी अजूनही कॉंग्रेसमध्येच आहे. मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो नव्हतो. मी त्यावेळी माझ्या घरी झोपलो होतो. त्यामुळे याबद्दल मला काहीही कल्पना नाही.'

त्यांच्या या अजब विधानामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

दरम्यान, विश्वजीत राणे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरही टीका केली आहे. गोव्यात काँग्रेस अस्तित्वात नाही, असा टोला राणेंनी लगावला आहे. तसंच गोव्यात काँग्रेस पक्षाच्या तोडफोडीमधेये भाजपचा कोणताही सहभाग नसल्याचं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपमध्ये कुणीही येऊ शकतात, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी काँग्रेसमधील आमदारांना पक्षात आमंत्रण दिल्याचंच चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com