Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Congress Press Conference: काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील दरी वाढल्याचे दिसून येते.
Congress leader Manikrao Thackeray
Congress leader Manikrao ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक 2027 साठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षांमधील समीकरणे वेगाने बदलत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने त्यांच्यात संभाव्य युतीचे चित्र पूर्णपणे धूसर झाले आहे.

'आप'चे गोवा राज्य संयोजक अमित पालेकर यांनी टीकास्त्र डागल्यानंतर काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील दरी वाढल्याचे दिसून येते.

'आप'ने भूमिका स्पष्ट करावी: माणिकराव ठाकरे

गोवा (Goa) काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की, "आम आदमी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांना भाजपविरुद्ध लढायचे आहे की काँग्रेसविरुद्ध हे अजूनही स्पष्ट नाही."

गोव्यातील जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, "लोक आता म्हणू लागले आहेत की भाजपला सत्तेत आणणे हे भविष्य नाही. आज काँग्रेस पक्षाची स्थिती वेगळी आहे, लोक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत."

Congress leader Manikrao Thackeray
Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, "इतर विरोधी पक्षांसोबत सत्तेतील भाजप पक्षाची निवडणुकीबाबत काय रणनीती राहते, याचेही अवलोकन करावे लागेल. काही पक्षांना वाटते ते काँग्रेस पक्षाच्या विचारांशी सहमत आहेत. पण मला एवढेच जाणून घ्यायचे आहे की, त्यांची नेमकी भूमिका काय आहे."

कोण अमित पालेकर? साडेतीन वर्षे झोपले होते का?

दुसरीकडे, गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही 'आप'चे नेते अमित पालेकर (Amit Palekar) यांच्यावर पलटवार केला. पाटकर म्हणाले की, "मी पालेकर यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप पाहिलेले नाहीत. पत्रकार परिषद पाहिल्यानंतरच मी भाष्य करेन."

पाटकर यांनी थेट पालेकर यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत विचारले, "कोण अमित पालेकर? ते साडेतीन वर्षे झोपले होते का?" पाटकर यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढल्याचे स्पष्ट होते.

Congress leader Manikrao Thackeray
Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

'आप'ची काँग्रेसवर टीका

याआधी, 'आप'चे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते की, "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरियातो फर्नांडिस यांच्याविरोधात काम केले. पण 'आप'ने मात्र प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम केले. त्याची काँग्रेसला जाणीव नाही. भाजप सरकारविरोधात आंदोलने छेडण्यात 'आप'च आघाडीवर आहे."

Congress leader Manikrao Thackeray
Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

तसेच, 'आप'चे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनीही काँग्रेसवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "काँग्रेसच्या साथीनेच भाजप वारंवार राज्याच्या सत्तेत येत आहे. केवळ गोव्यातच नाही, तर देशभरात काँग्रेस भाजपला मदत करत आहे. त्यामुळे 'आप'ने काँग्रेससोबत युती करु नये, अशी लोकांची इच्छा होती."

एकूणच, भाजपविरोधात मोट बांधण्याऐवजी गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि 'आप'मध्येच शाब्दिक युद्ध सुरु झाल्यामुळे आगामी 2027 विधानसभा निवडणुकीत युतीचे चित्र अत्यंत गुंतागुंतीचे होण्याची शक्यता दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com