Goa Politics: काँग्रेस नेते ज्यो डायस यांचा भाजपात प्रवेश

Goa Politics: आलेक्स सिक्वेरा यांचा सत्कार: भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन
Goa congress
Goa congressDainik Gomanatk

Goa Politics: नुवे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा सत्कार शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी कॉंग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्यो डायस यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Goa congress
MLA Digambar Kamat: हाज यात्रेसाठी गोव्यातून थेट विमानसेवा सुरू करू; आमदार दिगंबर कामत

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला. ते म्हणाले, की काँग्रेस हा केंद्रात व राज्यात नेतृत्व नसलेला पक्ष आहे. जेव्हा हा पक्ष सत्तेवर होता, तेव्हा केवळ स्वार्थ व कुटुंबासाठीच त्यांनी काम केले.

कॉ़ंग्रेस पक्षाने केंद्राकडून गोव्यासाठी कधीही विकासाभिमुख योजना आणल्या नाहीत, पण भाजपने गेल्या ९ वर्षांत गोव्याचा भरीव विकास केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे व्यक्तिविकासावर, अंत्योदय तत्त्वावर भर देते.

आलेक्स सिक्वेरा यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की जो लोकांसाठी काम करतो तो निवडून येतो. तेव्हा लोक पक्ष कुठला हे पाहात नसतात.

Goa congress
Goa Congress: गोव्यातील कलाकारांना वंचित ठेवणे हाच का सरकारचा ‘स्वयंपूर्ण गोवा’

सदानंद शेट तानावडे म्हणाले, की जर आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असेल, तर सत्तेत असणे फायद्याचे असते. आलेक्स सिक्वेरा हे भाजपमध्ये सामील झाले ते केवळ नुवे मतदारसंघाच्या विकासासाठी.

या सत्कार सोहळ्याला सभापती रमेश तवडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, विनय तेंडुलकर, बाबू कवळेकर उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांना कायम करणार

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले, की आपण नुवे मतदारसंघातील पाण्याचा प्रश्र्न सोडविला आहे. मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघासाठी प्रत्येकी एक हजार लीटर क्षमतेच्या पाच हजार टाक्या मंजूर केल्या आहेत.

त्याचबरोबर मतदारसंघातील जे वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी आहेत, त्यांना कायम करण्याचाही निर्णय झाला आहे. नागरिकांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com