Coastal Environment: रेईश मागूशच्या परिसरात मांडवी नदीच्या काठी बेकायदेशीरपणे डोंगरकापणी; गिरीश चोडणकर

Coastal Environment: मांडवी पात्रानजीक बेकायदा डोंगरकापणी; किनाऱ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास
Girish Chodankar
Girish Chodankar Dainik Gomantak

Coastal Environment: भाजप सरकारची मेहरनजर असलेल्या घटकांनी यापूर्वीच डोंगर बोडके केले आहेत. आता त्यांची वक्रदृष्टी किनारपट्टीकडे वळली आहे. रेईश मागूशच्या परिसरात मांडवी नदीच्या काठी बेकायदेशीरपणे डोंगरकापणी सुरू असून याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

Girish Chodankar
Panjim Theft News: वाहनातील 9 लाखांचा ऐवज लंपास : गुन्हा दाखल

प्रसिद्धी पत्रकात चोडणकर म्हणतात, मला आश्‍चर्य वाटते, रेईश मागुश येथील मांडवी नदीच्या काठावरील मोकळ्या जागेत माती टाकणाऱ्या रिसॉर्टवर सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.

कायद्याचे उल्लंघन करणारे हे भांडवलदार  भाजप सरकारचे  मित्र आहेत आणि त्यामुळे राज्यात बेकायदेशीरपणा वाढत आहे. झपाट्याने नष्ट होत असलेल्या आमच्या समुद्रकिनाऱ्यांच्या संरक्षणाचा मुद्दा सरकार बाजूला सारत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारने आमचे किनारे वाचवावे.

Girish Chodankar
Fuel leak In Goa: पोलिस तक्रारीनंतर 12 दिवस उलटूनही दखल नाही

सीआरझेडचे उल्लंघन

आधी आमचे डोंगर उद्‌ध्वस्त केले, आता भाजपचे भांडवलदार नदीकाठावर/किनाऱ्यावर डोळे लावून बसले आहेत.

साळगाव मतदारसंघातील रेईश मागूश येथील मांडवी नदीच्या काठावरील मोकळ्या जागेवर रिसॉर्टने माती टाकून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले असून हे सीआरझेडचे खुलेआम उल्लंघन आहे. याकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

पंचायत अंधारात

कोणतीही परवानगी न घेता आणि स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून हे बेकायदेशीर काम केले जात आहे. आमदार केदार नाईक आणि भाजप सरकार आपल्या मित्रांना संतुष्ट करण्यासाठी येथे सर्व बेकायदेशीर प्रकारांवर गप्प बसलेले आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानेही याकडे दुर्लक्ष कले असून त्यांचाही नदीचा किनारा नष्ट करण्यात सहभाग आहे. त्यामुळे त्यांनाही ताबडतोब अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com