Fuel leak In Goa: पोलिस तक्रारीनंतर 12 दिवस उलटूनही दखल नाही

Fuel leak In Goa: इंधन गळती: चोरीचा संशय बळावला; स्थानिक धास्तावलेलेच
Fuel leak In Goa
Fuel leak In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fuel leak In Goa: जुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीला गळती लागली आहे की, हे पेट्रोल चोरीचे प्रकरण आहे याचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी करत चिखलीच्या पंच नीलम नाईक यांनी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करून १२ दिवस उलटले तरी संबंधितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पंच नीलम नाईक यांनी खंत व्यक्त केली आहे.

Fuel leak In Goa
Goa Mining: गाव उद्ध्वस्त होत असेल तर आम्हाला खाण व्यवसाय नकोच! खाणीविरोधात एल्गार

दाबोळी-चिखली व्हडलेभाट परिसरात जुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीला गळती लागून संपूर्ण हा परिसर प्रदूषित झाला आहे. या परिसरातील विहिरी, नाल्यांतील पाणी प्रदूषित झाल्याने तेथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील जमिनीत इंधन मिसळत असल्याने येथील ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

दोन आठवडे झाले तरी, या परिसरातील विहिरी, नाल्यांत इंधन सापडत आहे. याप्रकरणी पंच नीलम नाईक आणि बिगर सरकारी संस्था ‘सवेरा’च्या प्रमुख तारा केरकर यांनी वास्को पोलिस स्थानकात जुआरी इंडियन ऑईल कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Fuel leak In Goa
Goa Illegal Construction: 23 हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे!

तक्रार दाखल करून 12 दिवस झाले तरी, पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्याने नाईक आणि केरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित कंपनी आणि मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती या इंधन गळतीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप पंच नीलम नाईक आणि तारा केरकर यांनी केला आहे.

पोलिस निरीक्षक नायक म्हणाले की, चिखली-व्हडलेभाट परिसरात पोलिस दिवस-रात्र गस्त घालत आहेत. पंच नीलम नाईक आणि तारा केरकर यांच्या तक्रारी आम्ही स्वीकारल्या असून, आम्ही मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती आणि कंपनीच्या अहवालाची वाट पाहात आहोत. अहवालानंतरच पोलिस पुढील कार्यवाही करतील.

पोलिसही कंपनीवरच अवलंबून

वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांना विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती व संबंधित कंपनीकडे इंधन गळतीविषयी माहिती मागितली आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात काही प्रश्न विचारले आहेत. त्याचे उत्तर आल्यानंतर संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल.

इंधन गळतीप्रश्‍नी कारवाई करण्यात मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समिती अपयशी ठरली आहे, असे सांगत गिरीश चोडणकर यांनी दाबोळी आमदारांच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला आहे. ही कंपनी अदानींशी संबंधित असल्याने सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. अदानींचा संबंध असेल तर त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

इंधन गळतीप्रश्‍नी सरकारी यंत्रणेने त्वरित कारवाई करायला हवी होती. परंतु स्थानिक आमदार येथे सन्माननीय पाहुण्यांसारखे काम करत आहेत. स्थानिक आमदारांनी तेल गळतीवर जातीने लक्ष न ठेवल्याने व्हडले भाट परिसरातील लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com