भिकारी, फेरीवाले यांना नावेली फेस्तातून हटविण्याची काँग्रेसची पोलिसांकडे मागणी

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन
Youth Congress
Youth CongressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Congress demands police to remove beggars and hawkers from Navelim Fest

फेरीवाले आणि भिकारी यांनी नावेली फेस्ताच्यावेळी उपद्रव केल्याची टीका करून, त्यांना तेथून हटविण्याची मागणी प्रदेश युवक काँग्रेसने पोलीस उपअधीक्षक, मडगाव यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

Youth Congress
Goa News: नरकासूर स्पर्धेवरुन काँग्रेसचा ढवळीकरांवर निशाणा

दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी अन्य सदस्यांसह उपअधीक्षकांची भेट घेऊन त्यांना फेस्तास जाणाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना देऊन सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या फेस्तासाठी अतिरिक्त पोलीस नेमण्याची मागणी केली.

मजा करण्यासाठी लोक फेस्तास येत असतात. जे व्यवसाय करतात, त्यांना कोणतीही अशी समस्या उद्भवू नये. सर्व काही सुरळीच चालायला हवे. आम्ही उपअधीक्षकांची भेट घेऊन, त्यांनी अतिरिक्त पोलीस नेमावेत आणि फेरीवाले तसेच भिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली, त्यांनी यासंबंधी पावले उचलण्याची ग्वाही दिली आहे, असे नाडर यांनी सांगितले.

अनेक स्थानिक आणि पारंपरिक विक्रेते फेस्तासाठी आपले स्टॉल घालतात. अनेक जण अनधिकृतपणेही स्टॉल उभारतात. भिकारी पदपथ आणि रस्त्यांवर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. पोलिसांनी यावर कारवाई करायला हवी. भीक मागणे हा गुन्हा आहे आणि त्यामुळे पोलिसांनी हा उपद्रव केवळ फेस्ताच्या काळातच नव्हे तर अन्य वेळीही रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले.

दक्षिण गोवा युवा काँग्रेस जिल्हा समिती सदस्य वालेंट बार्बोझा देखील यावेळी उपस्थित होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Black And White Podcast With Amit Patkar
Goa Forward Congress Merger Proposal
Goa Assembly Election
Goa Police Presidents Color Award
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com