Goa News: नरकासूर स्पर्धेवरुन काँग्रेसचा ढवळीकरांवर निशाणा

Goa Breaking News 15 November 2023: पणजी, मडगाव, म्हापसा तसे राज्यातील ब्रेकिंग बातम्या
Goa Live Updates 15 November 2023
Goa Live Updates 15 November 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरीतील नरकासूर स्पर्धा; हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल सरकारचा निषेध करण्याचे धाडस ढवळीकरांनी करावे - काँग्रेस

पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षावर आरोप करणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्याचे धाडस करावे, अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

बेतुलच्या नदीत तीन मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु

बेतुलच्या नदीत तीन मुले बुडाल्याची घटना समोर आली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर, सध्या 11 वर्षीय मुलाचा शोध सुरु आहे.

घरफोडी व वाहन चोरीप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या सुलेमान शेख (३०, नुवे) व शब्बीरसाहब शदावली (३०, फातोर्डा) या दोघांपैकी सुलेमान याला यापूर्वी वास्कोत घरफोडीप्रकरणी अटक झाली आहे. हल्लीच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील स्नूकर या खेळामध्ये सुलेमान याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. दुसऱ्या फेरीत तो बाद झाला होता. कसिनो जुगाराचा छंद असल्या तो चोरी करत होता. या दोघांकडून पोलिसांनी ८.५० लाख किंमतीचे १६२ ग्रॅम सोने व दोन स्कुटर्स जप्त केल्या आहेत.

चिखली उप जिल्हा रुग्णालयात स्टाफ भरतीसाठी प्रक्रिया सुरू!

चिखली उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर स्टाफची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रक्रिया सुरू.नव्या पदांच्या निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवरील आवश्यक पत्रव्यवहार व प्रक्रिया पूर्ण,सुत्रांची माहिती.

विश्वजीत राणे हात जोडतो, आता तरी लक्ष द्या!

चिखली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व इतर स्टाफची कमतरता. मी मंत्री राणेंना सांगून थकलो. मोठ मोठी इस्पितळे बांधून होणार नाही. लहान रुग्णालयांमध्ये साधनसुविधा पाहिजेत. वाणी खानापूरकर या लहान मुलीच्या मृत्यूची मी चौकशी करणार, मंत्री माविन गुदिन्होंचा सरकारला घरचा आहेर.

मायणे निरंकाल येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला, कुत्र्याचा कान तुटला; आठवड्यातील दुसरी घटना

गोव्यातील मायणे निरंकाल या गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. नुकतेच येथील एका ग्रामस्थाच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी बिबट्याची कुत्र्याशी झटापट झाली होती.

या झटापटीने संबंधित कुत्र्याचा मालक प्रल्हाद सत्तरकर यांना जाग आली. त्यांनी लाईट लावल्यानंतर बिबट्या कुत्र्याला सोडून पसार झाला.

घरफोडी तसेच वाहन चोरीप्रकरणी सुलेमान आणि शब्बीर या दोघा चोरांना पर्वरी पोलिसांकडून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयितास अटक

21 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित अविनाश चव्हाण (म्हापसा) याला अटक केली. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली. संशयिताने पीडिता व तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत धमकी दिली.

आदिवासींच्या कार्यक्रमाला आदिवासी नेतेच गैरहजर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदीवासींचे दैवत बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमाला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्री व्हर्ज्युअल माध्यमातून सहभागी. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी गोव्यातील आदिवासी आमदार मंत्र्यांची मात्र अनुपस्थिती.

पंतप्रधानांची 'विकसित भारत संकल्प यात्रा'!

झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत संकल्प' यात्रेचा शुभारंभ. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर मंत्र्यांनी व्हर्चुअल (आभासी) माध्यमातून शुभारंभ कार्यक्रमात घेतला सहभाग.

झुआरीनगर येथील अपघातात पर्यटक महिलेचा मृत्यू

झुआरीनगर येथे रेंट-अ-बाईक आणि चारचाकीचा भीषण अपघात. बाईक चालवत असलेली पर्यटक महिला इनोव्हा कारच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू. पोलीस घटनास्थळी दाखल.

2027 मध्ये अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळण्याची भाजप सरकारची खात्री. राज्य सरकार याविषयी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत असून लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यासाठी जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

सर्व पोलिस स्थानके, आरटीओंना अल्कोहोल मीटर उपलब्ध करुन द्या: आमदार फेरेरा

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे गाडी चालवून पर्यटकांकडून सध्या कथित जीवघेणे अपघात घडताहेत. अशाने अनेकांवर जीव गमविण्याची पाळी ओढवली आहे. या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातास जितके कारचालक जबाबदार असतात, तितकेच पोलिस व आरटीओ दोषी असल्याचा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला आहे.

तेल समजून ओतले पेट्रोल; पणती लावताना झाला भडका अन् महिला होरपळली

हळदोण्यातील रामतळे येथे सोमवारी साईबाबांची पालखी घरोघरी जात असताना दिक्षिता नाईक या 32 वर्षीय महिलेसोबत एक अपघात घडला. पालखीसाठी पणत्या पेटवत असताना भडका होऊन विवाहिता जखमी झाली आहे.

गोव्यात दर आठवड्याला 5 महिला-मुलांवर लैंगिक अत्याचार; 50 टक्के गुन्ह्यांत टीनएजर्स ठरले बळी...

 राज्य सरकारच्या व्हिक्टिम असिस्टन्स युनिट (VAU) च्या अहवालानुसार, गेल्या 09 वर्षांत राज्यात दर आठवड्याला सरासरी 5 महिला आणि मुले लैंगिक अत्याचाराचे बळी ठरले आहेत.

सरासरी दररोज दोन महिला आणि एक अल्पवयीन अशा गुन्ह्यांना बळी पडतात. किशोरवयीन मुले लैंगिक शोषणाचे मुख्य बळी ठरले आहेत, असेही अहवालात नमूद केले आहे.

पणजीत महिला पोलिस स्टेशनमध्ये केवळ 1 अधिकारी; 2 महिला अधिकारी दीर्घ रजेवर

गोव्याची राजधानी पणजीत महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र महिला पोलिस स्थानक उभारले गेले आहे. तथापि, या स्थानकाचा कारभार आता केवळ एकाच अधिकाऱ्याकडे आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे तपासावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

या स्थानकाकडून महिला आणि बालकांबाबतच्या गुन्हेगारीच्या प्रकरणांचा तपास केला जातो. सध्या या स्थानकात केवळ एक महिला पोलिस निरीक्षक (एलपीआय) आहे.

या पोलिस ठाण्यात दोन महिला पोलिस उपनिरीक्षक मंजूर आहेत, मात्र दोघीही दीर्घ रजेवर आहेत.

दोनापावला जेटी बनतेय ‘पार्टी डेस्टिनेशन’

पर्यटकांसाठी खुली झालेली दोनापावला येथील प्रसिद्ध जेटी आता ‘पार्टी डेस्टिनेशन’ म्हणून ओळख निर्माण करू लागली आहे. या ठिकाणी सायंकाळनंतर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

जेटीवर जाण्यासाठी तिकीट आकारणाऱ्या कंपनीमार्फतच या पार्ट्यांना परवानगी दिली जातेय. त्यातून पर्यटन खात्याला चांगली महसूल प्राप्ती होऊ लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com