'कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास रस्ता रोको'

जिल्हाधिकाऱ्यांच्या निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा : ओलेन्सियो सिमॉईस
Goa Congress leaders Olencio Simoes
Goa Congress leaders Olencio Simoesdainik gomantak

वास्को : दिलीप बिल्डकॉनच्या मुख्य कंत्राटदाराने आरवळे, कुठ्ठाळी जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाहतूक वळविण्याबाबत सावधगिरीचे फलक लावलेले नाहीत. असे करणे म्हणजे मुख्य कंत्राटदाराने दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांच्या निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्याविरोधात आज काँग्रेसने आवाज उठविला. यावेळी काँग्रेसने दिलीप बिल्डकॉनच्या मुख्य कंत्राटदारा विरोधात आवाज उठवत आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते ओलेन्सियो सिमॉईस यांनी केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटी युवा अध्यक्ष पीटर फर्नांडिस आणि महिला अध्यक्ष अँड्रिया डेमेलो हे उपस्थित होते. (Congress demanded action against Dilip Buildcon's main contractor)

आरवळे कुठ्ठाळी जंक्शन (Kuthali Junction) येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर काल एकाचा अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला. या महामार्गावर वाहतूक रहदारी असल्याकारणाने हे जंक्शन अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम गेली पाच वर्षाहून अधिक काळ चालू आहे. काम चालू असताना या कामाच्या कंत्राटदाराने या ठिकाणी सावधगिरी बाळगणे गरजेचे होते. तसेच या ठिकाणी शाळा-महाविद्यालयात जाणारी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची ये जा चालू असते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) वाहतूक रहदारी रस्ता ओलांडताना सर्वांना धोक्याची बनले आहे.

दरम्यान या जंक्शनमध्ये वाहतूक पोलीस कायम गैरहजर राहत असल्याने वाहने मिळेल तशी जाताना दिसतात. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने याचा पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांना धोक्याचा मार्ग बनला आहे.

Goa Congress leaders Olencio Simoes
GCA CRICKET : ला-पाझ गार्डन दक्षिण विभागीय विजेते

येथील उड्डाणपुलाचे (Flyover) कंट्राटदार (contractor) आपल्या मर्जीनुसार महामार्गाच्या मार्गात बदल करून वाहतूक वळवत आहेत. मात्र याविषयी कोणतेही फलक लावले जात नसल्याने लहान-मोठे अपघात होत असतात. निष्काळजीपणामुळे काल या ठिकाणी अपघातात एकाल जीव गमवावा लागला. त्यामुळे सदर जीवित हानी रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) नेते सिमॉईस यांनी केली आहे. तसे न झाल्यास रस्ता रोको केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच कुठ्ठळी राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील प्रत्येक जंक्शनवर (junction) वाहतूक पोलिसांची (Police) वर्णी लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com