जनता मुख्यमंत्र्यांना घरी बसविण्यास सज्ज : सगलानी

साखळी येथील काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांची गर्दी
Dharmesh Saglani Congress
Dharmesh Saglani CongressDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी हुकूमशाही आणि सूडबुध्दीची निती वापरुन लोकांचा छळ चालवला आहे. त्यांनी नकारात्मक पध्दतीचे राजकारण गेली दहा वर्षे केले, त्यामुळे जनतेचे मन दुखावले आहे. जनता या मुख्यमंत्री आणि भाजप सरकारला कंटाळली असून या निवडणुकीत वचपा काढत मुख्यमंत्र्यांना घरी बसवण्यास सज्ज झाली आहे, असा निशाणा साखळीचे काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांनी केला आहे. (Dharmesh Saglani Congress News Updates)

Dharmesh Saglani Congress
Goa Election: नुवेतून बाबाशान अपक्ष रिंगणात उतरणार

साखळी मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज साखळी येथील 'लाडजी टॉवर्स'मध्ये करण्यात आले. यावेळी साखळी मतदारसंघातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले आणि एकत्र राहून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रभारी टी.रवी, माजी आमदार प्रताप गावस उपस्थित होते.

Dharmesh Saglani Congress
दयानंद नार्वेकर ‘अपक्ष’ लढणार!

मुख्यमंत्र्यांनी (Pramod Sawant) प्रत्येक गोष्टीमध्ये दबावतंत्र लादून आपला आणि कार्यकर्त्यांचा छळ केला आहे, त्याअर्थी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीची भीती वाटू लागली आहे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे, हे आम्ही प्रचारात फिरताना दिसून आले, असा निशाणा धर्मेश सगलानी यांनी साधला.

लोक आम्हाला फोन करुन पाठिंबा देत आहेत. आम्ही लोकांना शब्द दिला होता की उमेदवारी कुणालाही लाभल्यास एकत्र राहून काम करु. आज आम्ही शब्द पाळला आहे. जनतेने आपले कार्य पाहिलेच आहे. आमदार बनवून अधिक सामाजिक कार्याची संधी द्यावी, असे आवाहन सगलानी यांनी केले.

Dharmesh Saglani Congress
10 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश, गोव्यात 12 उमेदवार लढणार

काँग्रेस प्रभारी टी.रवी यावेळी बोलताना म्हणाले की, सर्व्हेनुसार गोव्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित आहे. साखळीतून सगलानी यांना जनतेने विधानसभेत पाठवावे. काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र असून आमच्यामध्ये फुटीची स्वप्ने भाजपने (BJP) पाहू नयेत. आम्ही एकजुटीने काम करुन काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com