Goa Congress: भाजपचे सरकार तुमच्या दारी, गोंयकार बसलाय बेकार घरी!

अमित पाटकर : काँग्रेसतर्फे मडगावात घटक राज्य दिन साजरा
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress भाजप सरकार केवळ जनतेच्या पैशाने उत्सव साजरे करीत आहे. दहा कोटीचे मंत्रालय बांधून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे.

भाजपचे सरकार तुमच्या दारी, गोंयकार बसलाय बेकार घरी’ अशी गोव्याची सध्या परिस्थिती आहे, असा टोला मडगावात घटक राज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला.

माजी खासदार एदुआर्द फालेरो, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार अॅड. कार्लूस फेरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, अमरनाथ पणजीकर, महिला विभाग प्रमुख बीना नाईक, कॅप्टन विरिएटो फर्नांडीस, जिल्हाध्यक्ष वीरेन शिरोडकर आणि सावियो डिसिल्वा, सेवादल प्रमुख जयदेव प्रभुगावकर, नौशाद चौधरी यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी एदुआर्द फालेरो यांना घटकराज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला.

Goa Congress
Fire At Mapusa: म्हापसा येथे राहत्या फ्लॅटला आग, लोहिया गार्डन समोरील घटना

पाटकर पुढे म्हणाले, ‘सेंगोल’चा (राजदंड) वापर करून सत्ता हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही अस्तित्वात नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांना भाजपला घरी पाठवून दाखविला आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेले चांगले संबंध वापरून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, हा अभिमानाचा क्षण आहे.

काँग्रेस नेते खासदार फ्रन्सिस सार्दिन, माजी खासदार एदुआर्द फालेरो आणि स्व. शांताराम नाईक यांनी केंद्रीय नेत्यांसह राज्यत्वासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

मोदींनी नेहमीच लोकांना दिशाभूल करण्याचा आणि नको असलेल्या गोष्टींनी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे.भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संसदेच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरावून घेतल्याबद्दल पाटकर यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘सेंगोल वापरून सत्ता हस्तांतरित करणारे मोदी हे राजा नाहीत, असेही ते म्हणाले.

Goa Congress
महिलेचा पाठलाग प्रकरणी आरोपीला 5,000 दंड आणि 1 महिन्याची कैद, मडगावच्या घटनेत सहा वर्षांनी निवाडा

एदुआर्द फालेरो म्हणाले, मुक्तीनंतर गोव्यात खूप विकास झाला आहे. ओपिनियन पोल दरम्यान लोकांनी आमच्या अस्मितायेचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले.

फ्रान्सिस सार्दिन म्हणाले, गोव्यासाठी घटक राज्य दिन हा मोठा आहे. आम्ही ओपिनियन पोल दरम्यान विलीनीकरणाच्या विरोधात लढलो आणि आमची ओळख जपली.

पुढे राजीव गांधींच्या प्रयत्नांनी आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आम्हांला घटकराज्याचा दर्जाही मिळाला.

अ‍ॅड. कालूस फेरेरा म्हणाले, काँग्रेसने पोर्तुगिजांपासून मुक्ती आणि घटकराज्याचा दर्जा मिळवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भाजप आमच्या देशात धर्म, प्रादेशिक धर्तीवर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते मणिपूरचे विभाजन करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आपण संघटित होऊन आपल्या राज्याचे रक्षण केले पाहिजे.

Goa Congress
Goa Higher Education: गोव्यात उच्च शिक्षण क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलीच जास्त! केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची माहिती

एम. के. शेख, बीना नाईक, विरियटो फर्नांडिस आदींची भाषणे झाली. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. एम. के. शेख यांनी स्वागत केले, तर सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले.

पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे राज्याला पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विलंब लागला, असे भाजपने चुकीचे विधान केले आहे. हे चुकीचे आहे आणि ते चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजप पक्ष, धर्म, भाषा आणि इतर मुद्द्यांवर लोकांमध्ये फूट पाडत आहे. काळा पैसा परत आणण्यात मोदी अयशस्वी ठरले आणि दिलेल्या सर्व आश्वासनांमध्ये त्यांनी यू टर्न घेतला आहे.

त्यांच्या जुमल्यांचा पर्दाफाश करण्याची आणि आपल्या देशाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. गोव्याची संस्कृती आणि शांतता जपण्यासाठी लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याची गरज असल्याचे पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com