महिलेचा पाठलाग प्रकरणी आरोपीला 5,000 दंड आणि 1 महिन्याची कैद, मडगावच्या घटनेत सहा वर्षांनी निवाडा

आरोपी हसन सय्यद पीडित महिलेचा पाठलाग करायचा तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी थांबून त्रास द्यायचा.
Margao Court
Margao Court Dainik Gomantak

Margao Court : महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी जून 2016 रोजी दाखल झालेल्या प्रकरणात, मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी हसन सय्यद याला पाच हजारांचा दंड आणि एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 15 दिवस कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. सहा वर्षानंतर न्यायालयाने हा निवाडा दिला आहे.

आरोपी हसन सय्यद पीडित महिलेचा पाठलाग करायचा तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी थांबून त्रास द्यायचा. संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा, 22 जून 2016 रोजी आरोपीने पीडित महिलेचा पाठलाग करून तिला त्रास दिला. याप्रकरणी मडगाव पोलिसांत भा.दं. सं कलम 354 डी अंतर्गत गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी 10 जानेवारी 2017 रोजी आरोपी सय्यद विरोधात मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आरोप निश्चित करून आरोपीला दोषी ठरवले. मात्र, आरोपीने सुधारण्याची संधी देण्याची मागणी केली.

Margao Court
Fire At Mapusa: म्हापसा येथे राहत्या फ्लॅटला आग, लोहिया गार्डन समोरील घटना

न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावत त्याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हसन सय्यद याला पाच हजारांचा दंड आणि एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

महिलांवरील अत्याचार गंभीर वा किरकोळ याला महत्व नाही. महिलांचे समाजातील हक्क आणि स्वातंत्र्य सुरक्षित करणे आवश्यक आहे. असे निरीक्षण या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने नोंदवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com