ब्रह्मेशानंदाचार्य, खेडेकर, मावजोंचे अभिनंदन: गोवा विधानसभा

लतादीदी, बिपीन रावत, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर सभागृहात शोक
Goa Assembly
Goa Assembly Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावेळी सभापतींनी देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत,गानकोकिळा लता मंगेशकर,समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींबाबत 25 शोक प्रस्ताव व ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी, ब्रह्मानंद सांकवाळवकर यांच्यासह त्यांच्यासह 7 मान्यवरांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले, त्याला सर्वमताने संमती देण्यात आली. शोक ठरावानंतर विधानसभेत एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. हे शोक व अभिनंदन प्रस्ताव त्या व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यात येतील, असे सभापतींनी स्पष्ट केले.

Goa Assembly
गोव्यात मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार ?

विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावामध्ये माजी आमदार लुईस आलेक्स कार्दोज व तिओतोनिओ परेरा, देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत, माजी लष्करप्रमुख सुनिथ रॉड्रिग्ज, ब्रिगेडियर कमांडंट इयान जॉन दा कॉस्ता, नामांकित इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, विक्टर अल्बुकर्क, राहुल बजाज, नामांकित कार्डिओलॉजिस्ट डॉ. मंजुनाथ देसाई, , प्रा. ए. के. श्रीवास्तव व नंदकिशोर पृष्टी, शिक्षतज्ज्ञ व स्वातंत्र्यसैनिक श्रीधर वेरेकर व यशवंत देसाई, उद्योजक दाजीबाब कुंडईकर, रामदास चाफाडकर, गानकोकिळा लता मंगेशकर, पं.बिरजू महाराज, डॉ. मारिया कुटो, संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी, डॉ.भिकाजी घाणेकर, पुनित राजकुमार व रमेश देव, अशोक नाईक तुयेकर व महेश गावकर, आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्न, चरणजीत सिंग यांचा समावेश होता.

Goa Assembly
गोवा विधानसभेत पाणीटंचाईचे पडसाद

यावेळी सभापतींनी मांडलेल्या अभिनंदन ठरावामध्ये माजी संरक्षणमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, सद्‍गुरु ब्रम्हेशानंद आचार्य स्वामीजी, ब्रह्मानंद सांकवाळवकर, विनायक खेडेकर तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, मास्टर व्यंकटेश धेंपो व विराज मराठे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त सभापतींनी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांचे तसेच राज्यातील शिगमोत्सव चित्ररथ देखावा स्पर्धेत तसेच लोकनृत्य स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवलेल्या महालक्ष्मी नागरिक समितीच्या सुयोग शिगमोत्सव मंडळ व सावईवेरे सख्याहारी यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com