गोवा विधानसभेत पाणीटंचाईचे पडसाद

मुख्यमंत्र्यांचे तोडग्याचे आश्‍वासन: पश्‍चिम बगलमार्ग स्टील्ट बांधकामाद्वारे
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फातोर्डा - मडगाव येथील पश्‍चिम बगलमार्गामुळे लोकांच्या शेतजमिनींचे नुकसान रोखण्यासाठी तेथे स्टील्ट वर बांधकाम करण्यात येईल. राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याशी चर्चा केली जाईल तसेच सोनसोडो येथील कचरा उचलून त्या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या विधेयकावेळी दिले.

CM Pramod Sawant
Goa Accident: अपघातातील जखमीचा मृत्यू

पश्‍चिम बगलमार्गामुळे जेथे शेतजमिनीचे नुकसान होऊन पूरस्थिती उद्‍भवू शकते, त्या 1.2 किलोमीटर अंतरामध्ये स्टील्टचे बांधकाम केले जाईल. भाजप सरकार सोनसोडो कचऱ्याचे राजकारण करायचे नाही. त्या ठिकाणचा कचरा पूर्णपणे उचलल्यानंतर तेथेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल. मडगाव पालिकेने या प्रकल्पाची जबाबदारी घ्यायला हवी. या कचरा प्रकल्पासंदर्भात तांत्रिक समितीने शिफारस केली आहे. त्यानुसार पुढे कार्यवाही केली जाईल. येत्या दोन महिन्यात राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नावर चर्चा व तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमदारांनी मांडलेल्या समस्यांवर उत्तर देताना सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज गोवा विनियोग विधेयक 2021- 22 तसेच पुरवणी मागण्या निधी विधेयक 2021- 22 मांडले व त्यावेळी विरोधी आमदारांनी पाण्याच्या समस्येसंदर्भात तसेच पावसाळ्यापूर्वी कामांबाबत समस्या मांडल्या. यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी सुरू असलेल्या वेस्टर्न बायपासच्या ठिकाणी स्टील्ट बांधकाम करण्याची, फातोर्डा मतदारसंघातील सुमारे 21 कोटींची कामे सुरू झाली होती कोणत्याही आदेशाविना बंद पाडण्यात आली आहेत ती पूर्ववत करावी तसेच सोनसोडो कचरा प्रश्‍नी त्वरित

प्रक्रिया प्रकल्पासाठी निर्णय घेण्याची मागणी केली. आमदार वेन्झी व्हिएगस यांनी पश्‍चिम बगलमार्गामुळे लोकांची पिकलेली शेती नष्ट होणार आहे, त्यामुळे तेथे स्टील्ट बांधकाम करण्याची मागणी केली.

लवकरच दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच गाळ उपसण्याची कामे हाती तातडीने घ्यायला हवीत, अन्यथा काही ठिकाणी पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे, असे आमदार मायकल लोबो म्हणाले. महसूल व भांडवल यांचा ताळमेळ नाही. महसूल कमी खर्च करून भांडवल वाढवण्याची मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.

CM Pramod Sawant
गोव्यात मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार ?

‘पाण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत’

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. लोकांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत आहे, तसेच कधी पाणी मिळेल,अशी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न तातडीने सोडवावा,अशी आमदार आलेक्स सिक्वेरा, आमदार दिलायला लोबो, आमदार केदार नाईक, आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी मागणी केली. ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी पश्‍चिम बगलमार्ग तसेच पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न धसास लावण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com