गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल

लोकायुक्तांनी स्वतःला न्यायमूर्ती ए. एच. जोशी म्हणणे थांबवावे
Governor Office
Governor Officedainikgomantak
Published on
Updated on

पणजी : नुकताच गोव्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून निकाल ही लागलेले नाहीत. तोपर्यंत गोव्याच्या प्रशासकीय वर्तुळात भुकंप आला आसून गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांच्याविरोधात राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई (Goa Governor PS Sreedharan Pillai ) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केली आहे.

Governor Office
निकालाची धाकधूक, मुख्यमंत्री साईदर्शनासाठी शिर्डीत

अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीत (written complaint), लोकायुक्त अंबादास जोशी (Goa Lokayukta Ambadas Joshi) हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. ते स्वत:ला न्यायमूर्ती समजत आहेत. पण सर्वोच्च पदावरील सेवानिवृत्त न्यायाधीश केवळ स्वत:ला न्यायमूर्ती म्हणून सादर करू शकतात, पण ते स्वत: निवृत्त आहेत हे सत्य असूनही.

Governor Office
जमीन घोटाळ्या प्रकरणी फातोर्डा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तसेच रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल पिल्लई (Governor Pillai) यांना 22 फेब्रुवारी 2022 च्या अलीकडील आदेशाची एक प्रत दिली आहे. ज्यामध्ये लोकायुक्तांनी स्वतःला ‘न्यायमूर्ती ए. एच. जोशी’ असे म्हटले आहे. त्यावर आक्षेत घेत रॉड्रिग्ज यांनी आज राज्यपालांकडे तक्रार दाखल केली. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, केवळ सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) किंवा उच्च न्यायालयाचे (High Court) विद्यमान न्यायाधीशच (Judge) स्वत:ला 'न्यायमूर्ती' (Justice) म्हणून आपला उल्लेख करू शकतात. मात्र अंबादास जोशी (Ambadas Joshi) हे जाणूनबुजून असे वागत आहेत. कायद्याने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलचे आणि प्रस्थापित प्रथेचे ते उल्लंघन करत आहेत. हा प्रकार म्हणजे थट्टा आहे.

तसेच उच्च घटनात्मक अधिकार (high constitutional authority) असलेल्या गोव्याच्या लोकायुक्तांनी स्वत:ला ‘न्यायमूर्ती’ (Justice) म्हणून सादर करत चुकीची माहिती देण्याचे धाडस केले आहे. हेही अत्यंत दुर्दैवी असल्याचे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे, तसेच अॅड. रॉड्रिग्स यांनी त्यांच्या निवेदनात, राज्यपाल पिल्लई यांनी तत्काळ हस्तक्षेप करावा. तसेच लोकायुक्तांनी स्वतःला न्यायमूर्ती ए. एच. जोशी असे सादर करणे थांबवावे यापुढे स्वत:ला न्यायमूर्ती (निवृत्त) ए.एच. जोशी म्हणून सादर करावे असे निर्देश द्यावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com