निकालाची धाकधूक, मुख्यमंत्री साईदर्शनासाठी शिर्डीत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत साईबाबांच्या चरणी, म्हणाले जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantdainikgomantak
Published on
Updated on

पणजी : नुकताच गोव्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून काही दिवसांवरच निकाल लागणार आहे. एकीकडे निकालाची वाट गोव्याची जनता बघत असताना निकालाची धाकधूक घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. (CM Pramod Sawant visits to saibaba temple at shirdi)

CM Pramod Sawant
12व्या कुडो राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाची बाजी

गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीचे (Assembly elections) मतदान पार पडले असून निकालाआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे देवदर्शन करत आहेत. त्यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर ते शनि शिंगणापुर (Shani Shinganapur) येथे शनिदेवाचे तर पुणे येथील दगडूशेट हलवाई गणपतीचे (Dagdushet Halwai Ganpati) दर्शन घेणार आहेत.

यावेळी साईदर्शनानंतर पत्रकाराशी संवाद साधताना, 'साईबाबांनी मला सगळं काही दिलय. पुन्हा एकदा राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी प्रार्थना आपण केल्याचे ते म्हणाले. तसेच इतर पक्षांच्यासाठी ही निवडणून म्हणजे एक प्रयोग होती. मात्र गोव्यातील जनता हुशार आहे, त्यामुळे बाहेरच्या पक्षांचा काही फरक पडणार नाही. पुन्हा एकदा गोव्यात भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CM Pramod Sawant
कांदोळीत वाळूच्या ढिगाऱ्यातील वनस्पती हटवण्याचा प्रयत्न?

शिवसेनेला टोला

यावेळी शिवसेनेला(shivsena) टोला लगावताना, निवडणूक काळात शिवसेनेचे मोठमोठे नेते येऊन फक्त डरकाळ्या फोडतात, असे म्हटले आहे.

पणजीतही आमचाच विजय

पणजीत (Panji) भाजपच्या (BJP) विरोधात माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढवली. त्यांना पक्षाने अनेक ठिकाणी संधी दिली होती. राष्ट्रीय पक्षाने दिलेली संधी कोणताही कार्यकर्ता नाकारत नाही. पण त्यांनी नाकारली. उत्पल यांचा प्रभाव फक्त पणजीपुरता मर्यादित आहे. तेथे आमचाच उमेदवार निवडून येईल, असा दावाही सावंत यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com