Fatorda land scam
Fatorda land scamDainik Gomantak

जमीन घोटाळ्या प्रकरणी फातोर्डा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटी कन्व्हेयन्स डीड वापरून फसवणूक
Published on

मडगाव : भूमापन आराखडा खोटी केल्याच्या आरोपावरून आणखी एका जमीन घोटाळ्यात फातोर्डा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणातील दोन आरोपी, मारियानो लॅब्रँचेस आणि प्रकाश सामंत यांनी उटोर्डा येथील मालमत्तेची जमीन सर्वेक्षण योजना बनावट बनवली आणि जमीन (land) नोंदणी अधिकार्‍यांसमोर विक्रीचे डीड करण्यासाठी मूळ म्हणून सादर केले.

Fatorda land scam
सुदिन ढवळीकर म्हणतात; विश्वजित राणे, नीलेश काब्राल मुख्यमंत्रीपदासाठी योग्य

ही घटना 18 जुलै 2019 रोजी घडली. अँथनी फर्नांडिस यांनी नुकत्याच दाखल केलेल्या तक्रारीवरून फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस (police) सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी, फातोर्डा पोलिसांनी खोटी कन्व्हेयन्स डीड वापरून जमिनीचे फसवणूक करून मूळ जमीनमालकांकडून बळकावण्याची मागणी केलेल्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com