‘महालसा’ देवालयात वर्धापन सोहळा सुरू

अखंड नामस्मरण : उद्या शतचंडी अनुष्ठान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धार्मिक विधी
Mahalasa Anniversary
Mahalasa Anniversary dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : श्री क्षेत्र वरेण्यपुर, जुने म्हार्दोळ, वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय आणि इतर पंचायतन देवतांच्या प्रतिष्ठापनेचा 18 वा वर्धापनदिन उत्सवाला मंगळवारी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पडल्या.

वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही श्री महालसा नारायणी देवालय आणि इतर देवतांच्या प्रतिष्ठापनेचा 18 व्या वर्धापनदिन उत्सवास विविध धार्मिक विधीनुसार प्रारंभ झाला. सकाळी 7 वा. देवतांची पूजा झाली. नंतर सकाळी 9 वा. 32 दांपत्यांसह सामूहिक शतकलश पूजन शतकलशाभिषेक पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने संपन्न झाला. मंत्री सुभाष फळदेसाई सपत्नीक या धार्मिक विधीत सहभागी झाले होते.

Mahalasa Anniversary
Worship Of God: देवपूजा करण्याची योग्य दिशा कोणती माहितीय?

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते कुंकुमार्चन सेवा व इतर धार्मिक विधी करण्यात आल्या. तसेच शतचंडी अनुष्ठान आरंभ झाला. महानैवेद आरती, मंत्रपुष्प, पसायदान व दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. दुपारी 3.30 ते 5.30 वाजेपर्यंत भजन, 6 वा. पुराण व पालखी मिरवणूक संपन्न झाली, संध्याकाळी 7.30 वा. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्प, पावणी, तीर्थप्रसाद व अल्पोपाहार झाला. शेवटी रात्री 9 वा. श्री महालसा नारायणी शालेय विद्यार्थ्यांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

Mahalasa Anniversary
Mahalasa Narayani Temple : ‘महालसा नारायणी’चा उद्यापासून जत्रोत्‍सव; अखंड नामस्मरण

12 रोजी सकाळी 7 वा. धार्मिक विधी, देवतांची पूजा, पाठवाचन व 9 वा. 'कुंकुमार्चन सेवा', दुपारी 12 वा. 24 तास अखंड नामस्मरण (संकीर्तन) आरंभ, दुपारी 12.30 वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान, दुपारी 1 वा. महाप्रसाद. संध्या. 6 वा. पुराण व पालखी, 7.30 वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी तीर्थप्रसाद नंतर अल्पोपाहार होणार आहे.

Mahalasa Anniversary
Canada Hindu Temple Vandalised: कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा!

पालखी सोहळा : 13 रोजी सकाळी धार्मिक विधी, 12 वा. हवनद्वारा शतचंडी अनुष्ठान सांगता, 12.30 वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान व प्रार्थना. दुपारी 1.00 वा. महाप्रसाद होणार आहे. दुपारी 3.30 पासून भजन, श्री नवदुर्गा दिंडी पथकासमवेत पालखी सोहळा होणार आहे. 7.30 वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी, तीर्थप्रसाद नंतर अल्पोपाहार होणार आहे. रात्री 9 वा. ''विविधा'' कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com