Worship Of God: देवपूजा करण्याची योग्य दिशा कोणती माहितीय?

Tips For Worship: पूजा करतांना कोणत्या दिशेला उभे राहावे यालाही खूप महत्व आहे.
Worship Of God
Worship Of GodDainik Goamntak
Published on
Updated on

हिंदू धर्मात पूजा करण्याला खुप महत्व दिले जाते. सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ करुन पूजा केल्यास त्याचे चांगले फळ मिळते अशी धारणा आहे. सकाळी देवपूजा केल्याने देवांचा आपल्यावर आशिर्वाद राहातो असे मानले जाते. त्याचप्रमाणे संध्याकाळी घराधरात आजही शुभंकरोतीचे सूर कानी पडतात.

ज्या प्रमाणे पूजा करणे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे पूजा करताना योग्य दिशा कोणती असावी?, देवघर कोणत्या दिशेला असावं?, पूजा करणारा कोणत्या दिशेला उभा असावा?, यालाही खूप महत्व आहे. आज आपण पूजा करताना या गोष्टींची काळजी कशी घ्यावी याची माहिती करुन घेणार आहोत.

  • कशी करावी पूजा?

घरामध्ये पूजा करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे असल्यास ते खूप शुभ असते. यासाठी पूजास्थानाचा दरवाजा पूर्व दिशेला असावा. या दिशेशिवाय पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असेल तर उत्तम परिणाम मिळू शकतात.

घरामध्ये अशा ठिकाणी देवघर बनवा, जिथे दिवसभरात थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश नक्कीच पोहोचेल.

ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरातील अनेक वास्तू दोष दूर होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

Worship Of God
Makar Sankranti: मकर संक्रांतीला बनवलेली खिचडी ठरते आरोग्यदायी
Pooja
PoojaDainik Gomantak

पूजा (Pooja) कक्षात केवळ पूजेशी संबंधित साहित्य ठेवावे. इतर कोणत्याही वस्तू ठेवणे टाळा.

घराच्या मंदिराजवळ (Temple) शौचालय असणे देखील अशुभ आहे. त्यामुळे जवळपास शौचालय नसेल अशा ठिकाणी पूजागृह बनवावे.

घरातील (Home) मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करावी. पूजेनंतर घरभर घंटानाद करावा. घंटा वाजल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com