Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेतर्फे मालमत्ता पुनर्मूल्यांकन

म्हापसा पालिकेने हाती घेतलेल्या मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची (रीअसेसमेन्ट) प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत फक्त चार प्रभागांचे काम पूर्ण झाले.
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality: म्हापसा येथील पालिकेने हाती घेतलेल्या मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची (रीअसेसमेन्ट) प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत फक्त चार प्रभागांचे काम पूर्ण झाले. तर इतर प्रभागांची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

सध्या विविध कारणांमुळे या कामाला विलंब होत असल्याने या कामाचा वेग मंदावला असला तरी आता पुन्हा या कामास गती दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

उपलब्ध माहितीनुसार, आठ वर्षांच्या कालावधीनंतर म्हापसा पालिकेने सर्व घरे व व्यावसायिक आस्थापनांसाठी करांचे पुनर्मूल्यांकन सुरु केले. म्हापसा पालिकेने 2014मध्ये या करांचे शेवटचे पुनर्मूल्यांकन केले होते.

आरसीसी असलेल्या जुन्या व नवीन घरांकडून प्रति चौरस मीटर 4.40 रुपये कर वसूल केला जातो. मंगळूरच्या फरशा आणि दगडी भिंतीच्या जुन्या व नवीन घरांकडून 1.75 रुपये प्रति चौरस मीटर वसूल केले जातात.

तर आरसीसी किंवा आरसीसी गोदाम असलेल्या दुकान किंवा घरांमधून प्रति चौरस मीटर रु.17.70 रुपये वसूल केले जातात. याशिवाय घरे, दुकाने, हॉस्पिटल, मंगळूर टाइल्स असलेल्या हॉल आणि दगडी भिंती, गोदाम आणि औद्योगिक वसाहत यांच्याकडून 8.85 रुपये प्रति चौरस मीटर कर वसूल केला जातो.

Mapusa Municipality
Goa Government: सोनारबाग बंधारा बांधण्यासाठी सरकारकडून दबावतंत्र - आरजी नेते मनोज परब

ही प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झालेली. त्यानुसार, 1 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 या दोन महिन्यांच्या कालवधीत केली जाणार होती. मात्र इतर अपरिहार्य कामांसाठी पालिकेचे कर्मचारी अन्यत्र नियुक्त केल्यामुळे या प्रक्रियेवर परिणाम झाल्याने सध्या विलंब झाला.

यासंदर्भात मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवर परिणाम झाला.

कारण आमचे कर्मचारी हे बीएलओ ड्युटीमुळे होते. पुनर्मूल्यांकन करण्यासाठी नियुक्त केलेल्या 10 पैकी 10 कर्मचारी हे बीएलओ ड्युटीवर होते. याशिवाय बोडगेश्वर जत्रोत्सव संबंधित कामासाठी आमचे कर्मचारी हे तैनात होते. त्यामुळे देखील पुनर्मूल्यांकन कामाला विलंब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com