Colva Beach: महिलांचे चोरुन व्हिडिओ, फोटो काढायचा, महाराष्ट्रातील भामट्याला बेड्या; कोलवा बीचवर पोलिसांची कारवाई

Maharashtra man arrested Colva Beach: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा बीचवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Colva Beach
Colva BeachDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोवा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा बीचवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला पर्यटकांची त्यांच्या संमतीशिवाय छुप्या कॅमेऱ्यातून छायाचित्रे आणि व्हिडिओ काढणाऱ्या एका पर्यटकाला टूरिस्ट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पकडण्यात आलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे समुद्रकिनाऱ्यावरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असताना संशयित व्यक्ती आपल्या मोबाईलचा वापर करून महिला पर्यटकांच्या हालचाली टिपत होती. या व्यक्तीची वागणूक संशयास्पद वाटल्याने तिथे तैनात असलेल्या टूरिस्ट पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. जेव्हा पोलिसांनी त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्या फोनमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. या सर्व गोष्टी संबंधित महिलांच्या परवानगीशिवाय चित्रित करण्यात आल्या होत्या.

Colva Beach
Goa Street Race: 'पुढील 3 वर्षे गोवा स्ट्रीट रेस होत राहील'! CM सावंतांचे प्रतिपादन; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

पोलिसांची कारवाई

टूरिस्ट पोलिसांनी त्वरित या व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोलवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे राज्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा जातो. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर किंवा इतर कुठे प्रसारित केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

Colva Beach
Goa: 'सर्वधर्म समभावाच्‍या वृत्तीनेच गोमंतकीय जगतात'! मुख्‍यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; राज्‍यात टॅक्‍सी माफिया नसल्याचा केला दावा

गोवा पोलीस आणि पर्यटन विभागाने पर्यटकांना, विशेषतः महिलांना समुद्रकिनाऱ्यावर वावरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जर कोणालाही अशी संशयास्पद हालचाल दिसली, तर त्वरित जवळच्या पोलीस चौकीत किंवा तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Senior Citizen Cyber Fraud
Congress Alliance Goa 2027
Galjibaga Beach Erosion Goa
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com