काणकोण: ऐन चतुर्थीच्या काळात नारळाचे (Coconut) दर महागल्याने सामान्यांना त्रासदायक ठरणार आहे. गोवा (Goa) बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेत 80 भरतीच्या नारळाचा खरेदी दर प्रति नारळ 28 रुपये आहे. त्या खालोखाल 90 भरतीच्या नारळ खरेदीचा दर 26 रुपये तर 100 भरतीच्या नारळाचा खरेदी दर 23 रुपये, 120 भरतीच्या नारळाचा दर 22 रुपये, 180 भरतीच्या नारळाचा खरेदीचा दर 18 रुपये, 250 भरतीच्या नारळाचा खरेदी दर प्रति नारळ 14 रुपये असा आहे.
नारळ उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. प्रामुख्याने नारळ उत्पादनाला खेती (माकड) उपद्रवी ठरू लागले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त उत्पादन खेती खाऊन फस्त करीत आहेत. त्याशिवाय माडाखाली पडलेले नारळ रानडुकरे खात असल्याने बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागते, असे पैंगीण येथील बागायतदार विजयकुमार प्रभुगावकर यांनी सांगितले. गेल्यावर्षी 80 भरतीच्या नारळाचा दर प्रतिनारळ 25 रुपयांच्या आसपास होता. मात्र उत्पादनात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे.
"नारळाच्या किमंतीत वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत त्यापैकी एक म्हणजे वन्यप्राणी, पाडेलीची नेहमी जाणवणारी कमतरता तसेच जुने माड कोसळण्याच्या घटना यामुळे दरवर्षी उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी बागायतदारांनी नवीन जातीच्या कवाथ्यांची लागवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी बागायतदारांना प्रोत्साहित करण्यात येत आहे."
- कीर्तिराज नाईक गावकर (विभागीय कृषी अधिकारी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.