World Coconut Day: माझ्या गोव्याच्या भूमीत... गड्या नारळ मधाचे...

'२सप्टेंबर जागतिक नारळ दिन विशेष' (World Coconut Day)
गोव्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडे (World Coconut Day)
गोव्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडे (World Coconut Day) दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

ताटातले हुमण (Goan Traditional Fish Gravy) किंवा डाळीची आमटी ही नारळाच्या खोबऱ्याशिवाय (Grated coconut) शक्यच नाही. गोमंतकीयांच्या ताटातला स्वाद हा नारळाच्या चवीनेच (Taste of Coconut) परिपूर्ण होतो, हे कारण पुरेसं आहे ते म्हणजे आजच्या दिवशी '२सप्टेंबर' रोजी साजरा होणाऱ्या जागतिक नारळ दिनाला (World Coconut Day) गोमंतकीयांचा सहभाग नोंदवण्यासाठी.

गोव्यातील बाजारामध्ये विक्रीसाठी आकर्षक पद्धतीने रचून ठेवलेले नारळ
गोव्यातील बाजारामध्ये विक्रीसाठी आकर्षक पद्धतीने रचून ठेवलेले नारळ दैनिक गोमन्तक

खऱ्या अर्थाने 'कल्पफळ' असलेला हा 'नारळ' आमच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले सर्व स्वाद देतो. शहाळ्याच पाणी शक्तिवर्धक असते, ओले खोबरे स्वयंपाकाला स्वाद देते, तसेच सुक्या खोबऱ्याची चटकदार चटणी बनवाली जाते, खोबरेल तेलाएवढे माथ्यावर आतापर्यंत कोणचं चढून बसलेले नसावे, 'नारळाची साल ज्याला 'सोडणी' म्हटले जाते, ती जाळून होणाऱ्या धुरामुळे घरातील 'मच्छर' घरातून पळ काढतात, करवंट्यांची 'दवली' गोव्यातील काही स्वयंपाक घरात अजूनही वापरात असलेली पाहायला मिळते. हस्तकलेत करवंट्यानी सन्मान पूर्वक प्रवेश केला आहे, सौदर्यवतींच्या सौंदर्य प्रसाधनात त्याचा अप्रुपाने समावेश होतो. गुलबकावलीच फूल कुणीच आजवर पाहिले नसेल, पण गुलबकावलीच्या फळाचा जर कुठे संदर्भ आला तर ते फळ म्हणजे नक्कीच 'नारळ' असेल.

नारळाच्या झाडावर असलेल्या नारळाच्या पेंडया व झावळी या (नारळाची पाने)
नारळाच्या झाडावर असलेल्या नारळाच्या पेंडया व झावळी या (नारळाची पाने)दैनिक गोमन्तक

गोव्यात नारळच हा खरा सत्ताधीश आहे, असे म्हणावे लागेल. एवढी नारळाची वट घराघरांत आहे, नारळाला घरातील देवघरात स्थान आहे तसेच मंदिरातील देवाच्या गाभाऱ्यातही त्याचे स्थान देवतुल्यच आहे. गोव्याच्या भूमीत अस कोणताही गाव नसेल की जिथे पेंड्यांनी लगडलेल्या नारळाच्या झाडांची छत्रछाया नसेल. मांडांतून वाट काढत जाणारे सळसळते बांध, काठावरून आपल्यावर झुकणाऱ्या माडांना प्रतिबिंब दाखवणारे नदी - नाले , गच्च झावळ्याचं वैभव पायऱ्या पायऱ्यांवरून मांडत पुढे सरकणारे डोंगर उतार या साऱ्यांनी माडांच्या साथीने गोवायला निसर्गसौन्दर्य प्राप्त करून दिले आहे.

गोव्यात जेवण बनवण्यासाठी काही ठिकाणी अजूनही नारळापासून बनवलेली 'दवली' वापरली जाते
गोव्यात जेवण बनवण्यासाठी काही ठिकाणी अजूनही नारळापासून बनवलेली 'दवली' वापरली जाते दैनिक गोमन्तक

कल्पवृक्षांच्या छायेत अखंड नांदणाऱ्या गोव्याची ओटी सदैव भरल्या नारळाची राहो ... आणि त्यातला प्रत्येक नारळ बाकीबाबांनी (बा. भ. बोरकर) आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे भरल्या मधातच असो...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com