गॅटविक ते गोवा Air India ची फ्लाईट सुरु करण्यासाठी CM सावंत केंद्राशी चर्चा करणार; अहमदाबाद अपघातापासून बंद आहे सेवा

Gatwick To Goa Air India Flight: कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबोंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
Gatwick To Goa Air India Flight
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गॅटविक (लंडन) ते गोवा बंद करण्यात आलेली एअर इंडियाची विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी उत्तर गोव्यात सुरु झालेल्या मोपा विमानतळामुळे दक्षिणेतील दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे मत मांडले. दाबोळीवरुन मोपावर अनेक फ्लाईट्स वळविण्यात आल्याचे लोबो म्हणाले. तसेच, गॅटविक ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा दरम्यान सुरु असलेली विमानसेवा देखील बंद करण्यात आल्याचे नमूद केले. लोबोंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

Gatwick To Goa Air India Flight
'लव्ह जिहाद'चा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढताच सरदेसाई भडकले; म्हणाले, 'ते National Narrative', धर्मांतरणाची देखील मागितली आकडेवारी

लंडन ते गोवा थेट कनेक्टिव्हिटी देणारी ही फ्लाईट बंद झाल्याने मोठी गैरसोय असल्याचे लोबो म्हणाले. यावर बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी या विषयावर एअर इंडिया आणि नागरी उड्डाण मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

फ्लाईट लवकर सुरु होण्यासाठी मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

लोबो यांनी सभागृहात बोलताना राज्यातील दोन्ही विमानतळाच्या व्यवहार्यताबाबत विचार केला नव्हता का? असाही प्रश्न उपस्थित केला. मोपा विमानतळ राज्यात आल्यानंतर विदेशातील नवीन ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी निर्माण होईल, असाही दावा करण्यात आला होता. अबु धाबी, जर्मनी, कतार आणि लंडन सारख्या ठिकाणांनी विमानसेवा सुरु होईल, असे आश्वासन देण्यात आले होते, त्याचे काय झाले? असा सवाल देखील लोबोंनी उपस्थित केला.

Gatwick To Goa Air India Flight
Anti-Conversion Law: ‘गोव्यात धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची गरज’; मुख्यमंत्री सावंतांनी मागितले काँग्रेसचे सहकार्य

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्याती दोन्ही विमानतळावरुन ५० ते ५१ फ्लाईट्स कार्यरत असल्याचे सांगितले.

उत्तरेतील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगी कंपनीद्वारे चालवले जात असले तरी त्यातून सरकारला उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मोपा विमानतळ सुरु झाल्यापासून गोव्याला त्यातून ६५.८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com